शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा रोहितच लढणार, शरद पवार यांनी केली घोषणा; अन् रोहित पाटील गहिवरले..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 12:33 PM

कवठेमहांकाळ येथील शेतकरी मेळाव्यात घोषणा

कवठेमहांकाळ : आर. आर. पाटील यांचे कार्य रोहित पुढे नेत आहे. त्यामुळे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हेच आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी त्यांनी रोहितच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या मैदानावर शेतकरी मेळावा सोमवारी झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये एका कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी एका सामान्य कुटुंबातील जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्याकडे शेतकऱ्यांची गाऱ्हाणे घेऊन आला. आर. आर. पाटील नावाच्या या तरुणाला हेरले आणि विधानसभेची उमेदवारी दिली. ते निवडून आले.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आम्ही आर. आर. पाटील यांना ग्रामविकास खाते दिले. त्यांनी ग्रामविकासचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना गृहमंत्री पद दिले. त्यांनी पारदर्शक कारभार करून आपल्या पक्षाचा आणि खात्याचा नावलौकिक वाढवला. आपली निवड सार्थ असल्याचे आजही माझे मन सांगते, असे आर. आर. पाटील यांचे कौतुक शरद पवार यांनी केले.

राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साखर आणि दूध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवरही शरद पवार यांनी आपल्या भाषणात आसूड ओढला. तसेच महांकाली साखर कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तासगाव-कवठेमहांकाळ हा प्रगतशील मतदारसंघ व्हावा, या विचाराने सुमनताई पाटील आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग होऊ नये यासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतणार असल्याचे आश्वासन रोहित पाटील यांनी दिले.महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महांकाली साखर कारखाना सुरू करण्याबाबतची मागणी केली. आमदार अरुण लाड, चिमण डांगे, विराज नाईक, गणेश पाटील, विश्वास पाटील यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाला सुरेश पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शंकरराव पाटील, अमोल शिंदे, विकास हाक्के, संजय पाटील, सुरेखा कोळेकर, कुसुम कोळेकर, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, संजय पाटील, छाया पाटील, महेश पवार, दादासाहेब कोळेकर, महेश पाटील, शंतनू सगरे, अर्जुन गेंड, आदी उपस्थित होते. अमर शिंदे यांनी आभार मानले.

त्या पैलवानाला चितपट करणार : रोहित पाटीलकवठेमहांकाळ शहरात आणि तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. परंतु, माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यासमोर कुठलाही मोठा पैलवान उभा राहिला तरी मी या पैलवानाला चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यात पहिला विजय या विधानसभेचा असेल, अशी ग्वाही रोहित पाटील यांनी दिली.

अन् रोहित पाटील गहिवरले..तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या निधनानंतर मतदारसंघातील जिवाभावाच्या नागरिकांनी आम्हाला धीर दिला. यावेळी आमच्या हाताला हात धरून आम्हाला बळ दिले. त्यामुळे आम्हाला आज नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे सांगताना रोहित पाटील यांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाSharad Pawarशरद पवारRohit Patilरोहित पाटिल