माडग्याळ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिलीपकुमार हिंदुस्थानी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांपासून प्राथमिक शिक्षक बँकेची सत्ता शिक्षक समितीच्या हातात आहे. त्यांच्या काळात कर्जाचे हप्ते भरून शिक्षकांचे खिसे मोकळे झाले आहेत. बँकेत निवडून आल्यावर संचालकांचे कर्ज कसे नील होते, तसे शिक्षकांचे का होत नाही. यामुळे बँक ही शिक्षकांच्या हितासाठी आहे की संचालकांच्या हितासाठी, हे समजत नाही. बँकेची वसुली १०० टक्के असताना बँकेची प्रगती होत नाही. याचा विचार कुठेतरी होणे गरजेचे आहे. जुनी पेन्शन हक्क, शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. बँकेने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात न देता परस्पर नोकर भरती करण्याला माझा विरोध असून, तसे केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे हिंदुस्थानी यांनी म्हटले आहे.
या पत्रकावर संतोष काटे, प्रल्हाद हुवाळे, मल्लेशप्पा कांबळे, सुनील सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.