लोकमत न्यूज नेटवर्क
संख : भिवर्गी (ता.जत) येथे साठा केलेल्या वाळूची टेम्पोने (एम एच ०४ बी. यू ६७९९) वाहतूक सुरू होती. संख अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांच्या पथकाने धाड टाकून टेम्पो पकडला. यात दोन ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली.
महसूल विभागाच्या दुर्लक्षाने बोर नदी पात्रात वाळू तस्करी जोमाने सुरू आहे. भिवर्गी, करजगी, संख, खंडनाळ येथून वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे. भिवर्गीत आनंदराव बिराजदार यांच्या घरासमोर वाळू डेपो मारल्याची माहिती संख अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने दुपारी दोनच्या दरम्यान संख अप्पर तहसीलदारांच्या पथकाने धाड टाकली असता टेम्पोने अंदाजे दोन ब्रास वाळू नेत असल्याचे दिसले. तहसीलदारांनी ती जप्त करून टेम्पो तहसील कार्यालयात आणून ताब्यात घेतला. ही कारवाई अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे, कोतवाल चन्नाप्पा भोसले, भिवर्गीचे पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांनी केली.
फोटो ओळ : भिवर्गी (ता.जत) येथील आनंदराव बिराजदार यांच्या घरासमोरील साठा केलेला वाळू साठा आयशर टेम्पोने वाहतूक सुरू असताना संख अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांच्या पथकाने पकडला.