मिरज शहरात भाजी मार्केटचे काम रखडल्याने रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची समस्या आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात हायस्कूल रस्त्यालगत असलेल्या खंदकात भाजी मंडईची व्यवस्था करण्याची व शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सहा ओपन जिम सुरू करण्याची मागणी फाैंडेशनतर्फे करण्यात आली.
नवीन भाजीमंडईचे काम पूर्ण होईपर्यंत खंदकातील शासनाच्या जागेत तात्पुरती भाजी मंडई सुरू करण्यासाठी या जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार असल्याचे आयुक्त कापडनीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी महादेव कोरे, मनोहर कुरणे, शीतल पाटोळे, आतिष अग्रवाल, उमेश कुरणे, महेश चौगुले, नितीन सोनवणे, अजुमुद्दीन खतीब, जावेद पटवेगार, अरुण लोंढे, विकास कुलकर्णी, अरविंद जगनाडे, रफिक खतीब, सुधीर गोखले उपस्थित होते.
फोटो-२४मिरज०१