काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रात दहा उमेदवार इच्छुक, 'या' ठिकाणाहून एकही अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:06 PM2024-08-09T16:06:42+5:302024-08-09T16:07:27+5:30

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांसाठी दहा इच्छुकांनी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल केले होते. सर्वाधिक तीन ...

Ten candidates are interested in six assembly constituencies from Congress in Sangli district | काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रात दहा उमेदवार इच्छुक, 'या' ठिकाणाहून एकही अर्ज नाही

काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रात दहा उमेदवार इच्छुक, 'या' ठिकाणाहून एकही अर्ज नाही

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघांसाठी दहा इच्छुकांनी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल केले होते. सर्वाधिक तीन इच्छुकांचे अर्ज मिरज विधानसभा मतदारसंघातून दाखल झाले आहेत. तासगाव - कवठेमहांकाळ, खानापूर विधानसभा मतदारसंघातून एकही इच्छुक नाही.

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, मिरज विधानसभा मतदरसंघ आरक्षित आहे. या मतदारसंघातून सर्वाधिक तीन इच्छुक आहेत. यामध्ये चंद्रकांत सांगलीकर, माजी नगरसेवक दयानंद सोनवणे, रवींद्र गोविंद कोलप यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम, जतमधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार विक्रमसिंह सावंत, शिराळा मतदारसंघातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, इस्लामपूर मतदारसंघातून तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषा रोटे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे जिल्हा काँग्रेसकडे अर्ज दाखल केले आहेत.

खानापूर आणि तासगाव - कवठेमहांकाळ या दोन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा एकही नेता निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही. तेथील एकाही नेत्याने अर्ज दाखल केला नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

विधानसभेसाठी काँग्रेसकडून हे इच्छुक

इच्छुकाचे नाव - विधानसभा मतदारसंघ
डॉ. विश्वजित कदम - पलूस-कडेगाव
विक्रमसिंह सावंत - जत
जयश्रीताई पाटील - सांगली
पृथ्वीराज पाटील - सांगली
चंद्रकांत सांगलीकर - मिरज
दयानंद सोनवणे - मिरज
रवींद्र कोलप - मिरज
रवी पाटील - शिराळा
जितेंद्र पाटील - इस्लामपूर
मनीषा रोटे - इस्लामपूर

Web Title: Ten candidates are interested in six assembly constituencies from Congress in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.