शरद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून नशीब अजमावत असलेल्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारच नसल्याचे चित्र आहे. २१ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही, तर पाच उमेदवारांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे.राजकारणात उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडूनही उच्चशिक्षितांना प्राधान्य दिले जात नसल्याचेच दिसून येत आहे. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता, ही बाब समोर आली आहे.या निवडणुकीत एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ पाचजणांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. उरलेल्यांमध्ये बारावीपर्यंतच शिक्षण झालेले उमेदवार जास्त आहेत.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे, असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात उच्चशिक्षितांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार अपक्ष उभे आहेत. यातील अनेकांचे पदवीचेही शिक्षण झालेले नाही. दहा उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही. उर्वरित उमेदवार दहावी उत्तीर्णच आहेत. राजकीय पक्षांतील केवळ दोन उमेदवार पदवीधर आहेत. एकूण उमेदवारांत दोन अभियंते, तर एक डॉक्टर आहेत.
दहा उमेदवार अंडरग्रॅज्युएट; पाच पदवीपर्यंत शिकलेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:57 PM