शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सांगली जिल्ह्यात नवीन दहा जनावरे लम्पी बाधित, पशुसंवर्धनकडून ३३ जनावरांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 1:52 PM

जिल्ह्यातील वाळवा, पलूस तालुक्यांत लंपी आजाराची जनावरे सापडली आहेत

सांगली : जिल्ह्यात सोमवारी शेखरवाडी (ता. वाळवा) येथे सहा आणि पलूस तालुक्यातील मोराळे, सावंतपूर, भिलवडी स्टेशन येथे चार अशा दहा जनावरांना लंपी आजाराची नव्याने बाधा झाली आहे. यामुळे लंपी जनावरांची जिल्ह्यात ३३ संख्या झाली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात लंपी जनावरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने दक्ष झाला आहे. आजारी जनावरांची लगेच पाहणी करून त्याची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत लंपी त्वचा रोगाची २३ जनावरांना बाधा झाली होती. सोमवारी केलेल्या पाहणीमध्ये शेखरवाडीत सहा आणि मोराळे, सावंतपूर येथे प्रत्येकी एक, भिलवडी स्टेशन दोन अशा दहा जनावरांना नव्याने लंपी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. या सर्व जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार चालू झाले आहेत. तसेच चिकुर्डे, शेखरवाडीतील सहा जनावरांचा आजार बरा झाला असून, ते व्यवस्थित सध्या चारा खात आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी दिली.

११५०० जनावरांचे लसीकरण पूर्णजिल्ह्यातील वाळवा, पलूस तालुक्यांत लंपी आजाराची जनावरे सापडली आहेत. यामुळे या दोन तालुक्यांत लसीकरणास सुरुवात झाली असून, आतापर्यंत ११ हजार ५०० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मंगळवारी सांगलीतील पांझरपोळ येथील २०० गायींचे लसीकरण करणार आहे, असेही डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.

लसीचे दोन लाख डोस मिळणारजिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून एक लाख आणि राज्य शासनाकडून एक लाख असे दोन लाख लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लस मिळणार आहे. जिल्हा परिषद स्वीय निधीतून वीस लाख रुपयांची औषधे आणि वीस लाख रुपयांची लस खरेदी करणार आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली