शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

जतमधील दहा तलाव भरले

By admin | Published: November 09, 2014 10:48 PM

दरीबडचीत ठणठणाट : संख, दोड्डनालात २० टक्के पाणीसाठा

गजानन पाटील -दरिबडची -परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने दमदार पावसाच्या अभावाने जत तालुक्यामध्ये २६ तलाव व २ मध्यम प्रकल्पांपैकी फक्त १० तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर संख, दोड्डानाला मध्यम प्रकल्पामध्ये १० ते २० टक्केपाणीसाठा आहे. परिसरातील कमी पावसामुळे दरीबडची येथील साठवण तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता, रब्बी हंगामातील पिकांना होत असलेला पाणीपुरवठा, बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी थोड्या प्रमाणात हळूहळू कमी होऊ लागली आहे. सध्या तालुक्यामध्ये १७६९.८६ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा आहे. यावर्षी भूजल साठा चांगला असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, पाणी उपशाला जानेवारीअखेर बंदी घालणे आवश्यक आहे.तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी ५०० ते ६०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. पावसाअभावी सलग दोन वर्षे रब्बी व खरीप हंगाम वाया गेला होता. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकाव्या लागल्या होत्या. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली होती.यावर्षी मान्सून पावसाने जून महिन्यापासून थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. खरीप हंगामातील पिके आली होती. त्यानंतर मान्सून पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली होती. सर्व बंधारे, गावतलाव, पाझर तलाव भरून १० तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामध्ये सोरडी, सिद्धनाथ, भिवर्गी, जालिहाळ बु।।, प्रतापूर, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, कोसारी, सनमडी हे तलाव भरले आहेत. यातील कोसारी, प्रतापूर, तिप्पेहळ्ळी तलाव भरण्यासाठी म्हैसाळ योजनांतील पाण्याचा उपयोग झाला आहे. मात्र परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने बहुसंख्य तलावातील पाण्याची पातळी ५० ते ६० टक्कयापर्यंत आहे, तर संख मध्यम प्रकल्पामध्ये १० टक्के पाणीसाठा, दोड्डनालामध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे. तलावातील पाणीसाठातलाव पातळी साठागुगवाड, ९३.३० १५.२५ बिळूर - ७.३० उमराणी १०१.६० ७.९८ प्रतापपूर १०८.००५३.८८ खोजानवाडी -२.५० रेवनाळ ६२३.२०, ११.६६ बिरनाळ ९६.२०८२.९४ तिप्पेहळ्ळी १०५.५०५५.९० शेगाव ५७८.४०२७२.६५ शेगाव -२ -१.००वाळेखिंडी ८९.००१४६.०० कोसारी १२०.८६५१.१५ मिरवाड ४०.५०१०.१३ डफळापूर ९७.००८.३४बेळुंखी -४.०० येळवी ८३.००३१.२२ सनमडी ९८.८०७०.०० दोड्डनाला ५०६.००११६.३० संख- सील - ६०.०० सिद्धनाथ ४८८.५० ८७.५५सोरडी ९६.९५४५.५६ तिकोंडी ४३.४४, ३९.४५ जालिहाळ बु।। -पूर्ण संचय पातळीतिकोंडी ५१.५१२३.९५ भिवर्गी ५०८२७०दरीबडची साठवण तलाव कोरडादरीबडची परिसरामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर तलाव भरलाच नाही. या तलावास ५ कि. मी. अंतरावरून पाणी येते. उद्भव साठ्यात वाटेत बंधारे, पाझर तलाव आहेत. ते भरून पाणी यावे लागते.