गजानन पाटील -- संख --उन्हाची वाढती तीव्रता, कमी झालेला पाऊस, पाण्याचा अवाजवी उपसा, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचे दुर्लक्ष यामुळे जत तालुक्यात पाण्याची पातळी कमी झाल्याने २६ तलावांपैकी १० तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पांपैकी संख मध्यम प्रकल्प कोरडा, तर दोड्डनाला प्रकल्पासह ५ तलावांतील पातळी मृतसंचय पातळीपेक्षा कमी झाली आहे. जानेवारी महिन्यामध्ये ही स्थिती आहे, तर येत्या दोन महिन्यामध्ये पश्चिम भागातील तलाव वगळता बाकीचे तलाव कोरडे पडणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत पाणीसाठा संपुष्टात येणार असल्याने एप्रिल-मे महिन्यामध्ये तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आतापर्यंतची भीषण टंचाई जाणवणार आहे. म्हैसाळ योजनेच्या आवर्तनावरच ग्रामस्थांना तहान भागवावी लागणार आहे. गेल्या चार वर्षापासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी १००० फुटापर्यंत गेली आहे. पावसाअभावी सलग दोन वर्षे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.दोड्डनाला मध्यम प्रकल्पाखाली उमदी, जाडरबोबलाद, उटगी, निगडी (बु), लमाण तांडा (उटगी) या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत. पाणीपुरवठा मध्यम प्रकल्पावर अवलंबून आहे. सध्याचा पाणीपातळी मृतसंचयाखाली गेल्याने व विंधन विहिरीची पाणी पातळी तळाशी गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावाचे नाव क्षमतासध्याचा पाणीसाठाकोसारी५१.१५२१.२७गुगवाड५६.०१कोरडाबिळूर५८.८५कोरडाखोजनवाडी७०.८४कोरडाउमराणी४०.१७कोरडाप्रतापूर५८.८८५१.३४रेवनाळ८३.६०३१.६६बिरनाळ८६.५६६३.६७तिप्पेहळ्ळी५५.९०९.३१शेगाव-२४१.०५५.०० (मृतसंचय)तलावाचे नाव क्षमतासध्याचा पाणीसाठावाळेखिंडी१४६.००४४.०५शेगाव-१२८५.३६६४.००मिरवाड५५.९६५.००डफळापूर ४९.२८कोरडाबेळुंखी७०.८४२०.१६भिवर्गी ५०३.५४२२.७८दरीबडची६६.३६कोरडामध्यम प्रकल्पसंख७०३.६५कोरडादोड्डनाला२७४.३५२.९० (मृतसंचयाखाली)द्राक्षे, डाळिंब या फळबागा पाण्यामुळे धोक्यात आल्या आहेत. सध्याच्या द्राक्षे, डाळिंब फळांच्या हंगामाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या पाणी पुरवठ्यावर द्राक्ष हंगाम पार पडणार आहे. पण यावर्षी खरड छाटणी होणार नाही. परिणामी काड्या तयार होणार नाहीत. तसेच पाण्याअभावी बागा काढून टाकाव्या लागणार आहे.
जत तालुक्यातील दहा तलाव पडले कोरडे...
By admin | Published: March 09, 2016 11:59 PM