जिल्हा परिषद बांधकाम समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी सभापती जगन्नाथ माळी होते. या बैठकीत कामे परस्पर बदलली जात असल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. अनेक सदस्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. मागील बैठकीत एखाद्या विषयास विरोध दर्शविला असताना तो विषय किंवा कामे प्रसिद्ध होतात अथवा त्या कामांच्या निविदा निघतात कशा, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. कामांना परस्पर संमती कशी दिली जाते, असा सवाल अनेक सदस्यांनी केला. जिल्हा नियोजन समितीची कामेही समितीतील सदस्यांना विश्वासात घेऊन केली जात नाहीत. याबरोबरच नियोजन समिती व बांधकाम समिती सदस्यांना कामांचे समान वाटप केले जात नाही. काही ठराविक जणांनाच जादा कामे दिली जातात. हे तातडीने थांबवावे, असे काही सदस्यांनी सांगितले. यावर सभापती माळी यांनी यापुढेे सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा परिषद सभेत रद्द केलेल्या कामांच्या निघाल्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:49 AM