अंजर अथणीकर-- सांगली आॅगस्टच्या पंधरवड्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे गृहीत धरुन आमदारांनी आपल्या कामांचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षभरात ग्रामविकासमंत्री व वाळव्याचे आ. जयंत पाटील यांनी सर्वाधिक आमदार निधी खर्च केला आहे. त्यांचा २ कोटी ७२ लाख रुपये निधी खर्च झाला असून, त्यांच्यानंतर सर्वाधिक निधी खर्च करणारे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक ठरले असून, त्यांनी दोन कोटी ७० लाख रुपये खर्च केले आहेत. पतंगराव कदम यांचा वर्षभरात दोन कोटी ४७ लाख रुपये खर्च झाला आहे. सांगली जिल्ह्यातील आठ आमदारांना प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे सोळा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामधील पाच कोटी दोन लाखांचा निधी गतवर्षी सुचविलेल्या कामांवर खर्च झाला आहे. यावर्षी आठ आमदारांकडे १० कोटी ९८ लाख ६ हजारांचा निधी उपलब्ध आहे. यावर्षी उपलब्ध असलेल्या दहा कोटी ९८ लाख रुपयांमधील ६ कोटी ४१ लाखांची कामे गेल्या साडेतीन महिन्यात आमदारांनी सुचवली आहेत. आपल्या मतदार संघातील रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, समाजमंदिरे, शाळांमध्ये संगणक, नळपाणी योजना, कूपनलिका आदींचा यामध्ये समावेश आहे. गेल्या साडेतीन महिन्यात आमदारांनी २३३ कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी यांनी दिली. आॅगस्टच्या पंधरवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरुन आमदारांनी आपल्या कामांचा धडाका लावला आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व निधीच्या कामांना मंजुरी मिळावी व निवडणुकीपूर्वी सर्व कामे प्रगतिपथावर दिसावीत यासाठीही आमदारांचे प्रयत्न आहेत. आमदारांचे स्वीय सहाय्यक नियोजन समितीकडे दररोज पाठपुरावा करीत आहेत. सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी नियोजन समितीमधील अधिकारी व्यस्त आहेत. मार्च महिन्यापासून लोकसभेची, त्यानंतर मे महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता २४ जूनरोजी उठवली. गेला चार महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये गेल्याने आमदारांना नवीन कामे सुचवता आली नाहीत. आचारसंहिता काळात कामे सुचविणे किंवा त्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यास बंदी असल्याने निधी खर्चाचे कामकाज ठप्प होते. गतवर्षी सुचविलेल्या व मंजूर कामांचाच निधी खर्च झाला आहे. त्यामुळे आता येत्या वीस-बावीस दिवसांत सर्व निधी कसा खर्च होईल, यासाठी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांची कसरत सुरु झाली आहे. २०१३-१४ वर्षात आमदारांचा विकास कामावरील खर्च विधानसभाआमदारएकूण खर्च वाळवा जयंत पाटील२ कोटी ७२ लाख पलूस/कडेगावपतंगराव कदम२ कोटी ४७ लाख शिराळामानसिंगराव नाईक२ कोटी ७० लाख सांगलीसंभाजी पवार२ कोटी ६४ लाख मिरजसुरेश खाडे२ कोटी ५९ लाख तासगाव/क.महांकाळआर. आर. पाटील२ कोटी ६० लाख खानापूरसदाशिवराव पाटील२ कोटी ६६ लाख जतप्रकाश शेंडगे२ कोटी ६९ लाख
निधी खर्चासाठी जिल्ह्यातील आमदारांची धावपळ नियोजन समितीवर ताण
By admin | Published: July 24, 2014 11:02 PM