शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

गावात तणाव! गव्हाणमध्ये यात्रा रद्द झाल्यानंतर मंदिर उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 7:56 PM

Cancel yatra in Gawan : लक्ष्मी मंदिर उघडण्यावरून वादंग 

ठळक मुद्दे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तासगाव (जि. सांगली) : तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीची यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. मात्र बुधवारी सकाळी मंदिर उघडे करून पूजाअर्चा केल्यामुळे माजी सरपंच अभिजित पाटील यांनी आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गव्हाण येथील लक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द केली आहे. त्यामुळे भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, कोणीही मंदिरात नैवेद्य दाखवायला येऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने केले होते.मंदिराचे मानकरी दत्ता पवार यांनी बुधवारी सकाळी मंदिरात जाऊन पूजा केली. देवीला नैवेद्य दाखवला. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे बेकायदेशीर मंदिर उघडणाऱ्या पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजित पाटील, तुकाराम यादव यांनी केली.दत्ता पवार जर पूजा करीत असतील तर सर्वसामान्य लोकही मंदिरात जाऊन पूजा करतील, अशी भूमिका घेऊन काहींनी मंदिर उघडले, मात्र पोलिसांनी तत्काळ मंदिर बंद केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मंदिर परिसरात आणखी गर्दी झाली. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मोजक्या मानकऱ्यांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याचे ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या बैठकीत ठरले होते. दत्ता पवार मानकरी आहेत, असे स्पष्टीकरण सरपंच हणमंत पाटील यांनी दिले आहे. शिवाय याबाबतीत ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीची काहीही तक्रार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :TempleमंदिरSangliसांगलीPoliceपोलिस