मिरज : मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली व शेणोली- ताकारीदरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली.मिरज स्थानकात ज्ञानेश्वर पोतदार यांच्याहस्ते विधिवत विद्युत इंजिनची पूजा करून चाचणीसाठी इंजिन शेणोलीकडे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकारी उपस्थित होते.पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गावर मिरज-शेणोली ६३.२९ किमी व शेणोली-ताकारी १६.१५ किमी दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर सोमवारी विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली.
दरम्यान, मिरज-पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण, विद्युतीकरणासह विविध कामे करण्यात येत आहेत. या दुहेरीकरणासाठी या मार्गावर ७० टक्के मातीकाम सुरू आहे.
पुण्याजवळ पूल उभारणीचे काम सुरू आहे. पुणे-फुरसुंगीपर्यंतच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर यापूर्वीच चाचणी घेण्यात आली असून तीही यशस्वी झाली होती