प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेची २ कोटी ८८ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी अद्याप भरलेली नाही. त्यामुळे महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. शासनाने टंचाई उपाययोजना निधीतून दिलेल्या आवर्तनाची दोन कोटी साठ लाख, तर सप्टेंबरअखेरची नियमित आवर्तनाची २८ लाख अशी एकंदरीत २ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनास विलंब होत आहे.मागीलवर्षी तत्कालीन मदत कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेऊन राज्याच्या टंचाई उपाययोजनांची मुदतही वाढविली आणि सप्टेंबरपर्यंत टंचाई निधीतून योजनेची आवर्तनेही दिली. परंतु या आवर्तनांची २ कोटी ६० लाख रुपयांची वीज बिल थकबाकी अद्याप शासनाकडून येणे आहे. आता राज्यात भाजपचे सरकार आहे. शासनाने टंचाई काळातील वीज बिल भरावे. १ डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तनकार्यकारी अभियंता संजय डोईफोडे म्हणाले की, ताकारी योजनेची यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरू आहे. कारखानदारांकडून येणेबाकी असलेली १ कोटी रुपयांची पाणीपट्टीची रक्कम दोन दिवसात मिळेल. १९ नोव्हेंबरपर्यंत ही वीज बिल थकबाकी मिळावी, असे शासनास कळविले आहे. १ डिसेंबरपर्यंत यावर्षीचे व रब्बी हंगामातील आवर्तन देणार आहे.टेंभू योजनेचीही टंचाई उपाययोजना निधीतून आवर्तने दिली होती. दुष्काळसदृृश परिस्थितीत लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरून घेतले होते. आता या आवर्तनाची २ कोटी ५० लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे, अशी माहिती टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी झेंगटे यांनी सांगितली.
ताकारी, टेंभू सिंचन योजनांचे ५.३८ कोटी वीज बिल थकित
By admin | Published: November 07, 2014 10:52 PM