शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

सांगलीत अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:06 AM

सांगली : ‘खोटे बोलणाºया राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘दिल्ली, मुंबईचं सरकार कायम म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय...’ अशा घोषणांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. अंगणवाडी कर्मचाºयांचे एप्रिलपासूनचचे थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्या.

ठळक मुद्दे♦जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आंदोलनास हजेरी लावली.♦दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही ♦राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी नेमलेल्या शिफारशी स्वीकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, ♦लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत

सरकारविरोधात जोरदार घोषणा : सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘खोटे बोलणाºया राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘दिल्ली, मुंबईचं सरकार कायम म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय...’ अशा घोषणांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. अंगणवाडी कर्मचाºयांचे एप्रिलपासूनचचे थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द्यावी, खाण्यायोग्य आहार द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आंदोलनास हजेरी लावली. जिल्हाध्यक्ष स्रेहलता कोरे, आनंदी भोसले, नादिरा नदाफ, अरुणा झगडे यांनी नेतृत्व केले.अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत सरकारविरोधात असंतोष आहे. राज्य सरकारमधील महिला, बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र अंमलबजावणी केली जात नाही, याबद्दल अंगणवाडी सेविकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.यावेळी मंगला सराफ म्हणाल्या की, राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीसाठी नेमलेल्या शिफारशी स्वीकारून तातडीने मानधनवाढ द्यावी, अंगणवाडीतील मुलांना खाण्यायोग्य आहार द्यावा, आहारासाठी प्रतिलाभार्थी ४.४२ रुपये मिळतात. त्यात तिपटीने वाढ करावी, मार्चपासूनचे मानधन तातडीने द्यावे, एप्रिल २०१४ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना सेवासमाप्तीची रक्कम तातडीने द्यावी, लाभार्थीच्या आहाराचे पैसे न दिल्यामुळे पुरवठादार अडचणीत आले आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीचा फरक द्यावा, रिक्त जागांवर सेविका, मदतनीसांची नेमणूक करावी, प्रवास खर्चाची २०११ पासूनची रक्कम मिळावी आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास दि. ११ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व अंगणवाड्या बेमुदत बंद ठेवण्यात येतील.आंदोलनामध्ये कमल साळुंखे, रेखा साळुंखे, निलप्रभा लोंढे, मधुमती मोरे, वंदना सकळे,अलका विभूते, अलका माने, विजया जाधव, शुभांगी कांबळे, कल्पना पवार, माधुरी जोशी, मथुरा कांबळे, सुलोचना पाटील, सरला घोडे, बिस्मिल्ला मुल्ला, सुरेखा गायकवाड, जयश्री जाधव, कस्तुरा पट्टणशेट्टी, अरुणा जोशी, दयावती अजेटराव, मंगल माळी यांच्यासह सेविका व मदतनीस सहभागी होत्या.