शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत

By अविनाश कोळी | Published: March 11, 2024 6:45 PM

सांगली : सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीच्या वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती. बँकेची ही देखणी ...

सांगली : सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीच्या वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती. बँकेची ही देखणी इमारत आता काळाच्या पडद्याआड जात आहे. इमारतीची खरेदी केलेल्या कंपनीने येथे मोठे बांधकाम सुरू केले असून जुनी इमारत दृष्टीआड गेली आहे.वसंतदादा बँकेची मुख्य इमारत डेक्कन इन्फ्रा कंपनीने १० कोटी ७३ लाखांना लिलावात खरेदी केली आहे. खरेदीनंतर बँकेचा फलक हटवून कंपनीचा फलक लावण्यात आला होता. काही दिवस ही इमारत आहे तशीच उभी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कंपनीने दर्शनी भागात बांधकाम सुरू केले असून हळूहळू जुनी इमारत दृष्टीआड जात आहे. काळाच्या पडद्याआड जाणारी ही इमारत पाहून सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना होत आहेत.बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत मदन पाटील यांच्या प्रयत्नातून सांगली-मिरज रस्त्यावर भव्य, सुसज्ज व अत्याधुनिक अशी चार मजली इमारत बांधण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते २००१ मध्ये या इमारतीचे उद्घाटन झाले होते. कालांतराने आर्थिक घोटाळ्यांमुळे ही बँक अडचणीत आली. त्यानंतर बँक अवसायनात काढण्यात आली.२०१९ मध्ये तत्कालीन अवसायक निळकंठ करे यांनी ही इमारत विकण्याबाबतची परवानगी सहकार विभागाकडून मागितली होती. त्यानंतर त्यांनी लिलाव प्रक्रिया राबवून डेक्कन इन्फ्रा कंपनीला १० कोटी ७३ लाखाला ही इमारत विक्रीबाबतचा प्रस्ताव कायम केला. या लिलाव प्रक्रियेविरुद्ध ठेवीदार संघटना, अन्याय निर्मूलन समिती व अन्य संघटनांनी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. पाटील यांनी या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली होती. २०२३मध्ये स्थगिती उठविण्यात आली व लिलाव कायम करण्यात आला. आता कंपनीने बँकेच्या इमारतीचा ताबा घेऊन त्याठिकाणी बांधकामास सुरुवात केली आहे.

आर्थिक घोटाळ्यांमुळे बँक रसातळालाकधी काळी आर्थिकदृष्ट्या सक्षम व कार्यविस्तार मोठा असलेली ही बँक आर्थिक घोटाळ्यांमुळे रसातळाला पोहोचली. इमारतीची मुख्य इमारतही आता काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक