शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी

By अशोक डोंबाळे | Published: June 09, 2023 7:10 PM

ओझे कमी करण्याबाबत होती मतमतांतरे

सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व विषयांचे एकच पुस्तक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांसाठी १० लाख २५ हजार ४४६ पुस्तकांच्या प्रती मागविल्या होत्या. त्यापैकी सध्या १० लाख ५७७७ पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे हलके झाल्याने मुलांना आता वाकत नव्हे, तर धावत शाळेत जाता येईल.गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढल्यामुळे मुले शाळेत जाताना अक्षरश: वाकत जात होती. ओझे कमी करण्याबाबत मतमतांतरे होती. यावर अखेर शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १५ जूनपासून होणार आहे. या सत्रापासून एकात्मिक पाठ्यपुस्तकाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषय एकाच पुस्तकात देण्यात आले आहेत. सध्या या एकात्मिक पुस्तकांचे वितरण सुरू आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून जिल्ह्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांचा पुरवठा ९८ टक्के झाला असून, त्याचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोफत देण्यात येणार आहे.चार भागांत पुस्तकएकाच पुस्तकामध्ये सर्व विषय आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहेत. दोन-दोन महिने एका भागाचे पुस्तक न्यायचे, तो भाग संपल्यानंतर दुसऱ्या भागाचे पुस्तक याप्रमाणे एकावेळी एकच पुस्तक न्यावे लागणार आहे.वह्यांपासूनही झाली सुटकाएकात्मिक पुस्तकात पाठ संपल्यानंतर काही पाने कोरी सोडण्यात आली आहेत. या पुस्तकात गृहपाठ करण्याची व्यवस्था आहे. त्यावरच प्रश्नोत्तरेही लिहिता येणार आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत वह्या नेण्याची गरज राहिलेली नाही.अध्यायनही चांगल्या पध्दतीने होईलमुलांना एकच पुस्तक शाळेत न्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. शिवाय पुस्तकातच कोरी पाने असल्याने मुलांना नोट्स काढण्याची सवय लागेल. यातून आनंददायी शिक्षण मिळण्यास मदत होणार असून अध्ययनही चांगल्या पद्धतीने होईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी मिळाली पुस्तकेतालुका - प्राप्त पुस्तक प्रतीआटपाडी - ५८६१९जत - २३२८३४कडेगाव - ५४९५२खानापूर - ७०५१६क.महांकाळ - ७१२१७मिरज - १३७६६३पलूस - ५८९०५शिराळा - ५६०६९तासगाव - १०२९६८वाळवा - १६२०३४एकूण - १००५७७७

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी