शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

Sangli Politics: लोकसभेचा निकाल बिघडवणार आगामी विधानसभेची गणिते

By अशोक डोंबाळे | Published: June 06, 2024 4:01 PM

जिल्ह्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज : विद्यमान आमदारांची वाढली डोकेदुखी

अशोक डोंबाळेसांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील विजय झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्वच गणिते बिघडणार आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीतील दुस-या फळीतील इच्छुकांची संख्या वाढल्याने विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे. खानापूर, मिरज, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय पाटील यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा नेतृत्व केले. २०२४ च्या निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक होणार होती, पण पक्षातंर्गतच विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्ट्रिक हुकली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला. हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले.

जतमध्ये सावंत यांना धोक्याची घंटा..२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही जत विधानसभा मतदारसंघाने विशाल पाटील यांना हुलकावणीच दिली. २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पाठबळ विशाल पाटील यांच्या पाठीशी होते तरीही भाजपचे संजय पाटील यांनी सहा हजार २७१ मताधिक्य घेतले. हे मताधिक्य सावंत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

मताधिक्याचा खाडे, गाडगीळ यांना फटकासांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असतानाही अपक्ष विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. या मताधिक्याचा पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

विश्वजीत कदमांचे वर्चस्व कायमपलूस-कडेगावमधून ३६ हजार १८२ मताचे मताधिक्य देऊन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी वर्चस्व दाखवून दिले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी पलूस-कडेगावचे मताधिक्य चिंतेचा विषय आहे.

तासगावात नवे समीकरण..तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा मावळते खासदार संजय पाटील यांचा बालेकिल्ला आहे. पण, येथेही नऊ हजार ४११ मतांचे मताधिक्य विशाल पाटील यांना देण्यात आर. आर. पाटील गट यशस्वी झाला आहे. आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.

खानापूरमध्ये बाबर गटाचेच वर्चस्वखानापूर विधानसभा मतदारसंघातून स्वर्गीय अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर हे महायुतीच्या व्यासपीठावर होते. पण, त्यांच्या समर्थकांनी विशाल पाटील यांनाच बळ दिल्याचे मताधिक्यावरुन स्पष्ट होत आहे. आटपाडीतून जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी मताधिक्य देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे.

२०२४ निवडणुकीतील मतदानविधानसभा मतदारसंघ - संजय पाटील - विशाल पाटील - चंद्रहार पाटीलमिरज - ८४०२९ - १०९११० - ८०२१सांगली - ८५९९३ - १०५१८५ - ७१५६पलूस-कडेगाव - ५९३७६ - ९५५५८ - १३८५९खानापूर - ७५७९५ - ९२४५९ - १६९५६तासगाव-कवठेमहांकाळ - ८५०७४ - ९४४८५ - ७९४९जत - ७९१२५ - ७२८५४ - ६१७४

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदम