आटपाडी : राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. हे जरी खरे असले तरी निवडणुकीमध्ये सगळ्याच मर्यादा पार केल्याच्या घटना घडताना दिसून येतात. आटपाडी तालुक्यामधील एका गावच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी आखलेल्या चक्रव्यूहातून सोडवण्यासाठी चक्क मुख्यमंत्री साहेबांचाच फोन आल्याने तालुक्यात राजकीय खळबळ माजली आहे.आटपाडी तालुक्यामध्ये २५ गावच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे.तालुक्यामध्ये दोन्ही सत्ताधारी पक्षातील भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे. आटपाडी तालुक्यात या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या विळ्या-भोपळ्याचे नाते आहे.तालुक्यातील एका मोठ्या गावाची निवडणूक सत्ताधारी भाजपा व बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. आपल्याच गटाकडे गावची सत्ता रहायला हवी या साठी साम, दाम, दंड, भेद या तत्वांचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे.संघर्षाची चिन्हेघरातून ताब्यात घेण्यात आलेल्या उमेदवाराला पोलिस ठाण्यात पोहचेपर्यंत थेट मुख्यमंत्री यांचा फोन आल्याने सोडून दिले. राजकीय द्वेष हा निवडणुकीपुरता मर्यादित असायला हवा मात्र तो सध्या कोणत्या थराला चालला आहे याचा प्रत्यय आटपाडी तालुक्यामध्ये आला. अशा परिस्थितीत या गावाची निवडणूक अतिशय संघर्षाची होणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.असा घडला राजकीय कुरघोडीतून प्रकारग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यासाठी एका नेत्याने आपले राजकीय वजन वापरले आणि मध्यरात्रीच त्या उमेदवाराला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याचवेळी सरपंच पदाच्या उमेदवाराने आपल्या वरिष्ठ नेत्याला याची कल्पना देत घडलेला प्रकार सांगितला.वरिष्ठ नेत्याने हा प्रकार स्थानिक पातळीवर हाताळणे शक्य नसल्याने थेट मुख्यमंत्री यांच्याच कानावर हा विषय घालत राजकीय कुरघोडीतून होणारा प्रकार सांगितला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पोलिसांना फोन करत संबंधित उमेदवाराला सोडण्याचे आदेश दिले.
gram panchayat election: उमेदवारासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन, राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 2:08 PM