शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे असेल मिशन
2
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
3
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
4
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
5
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
6
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
7
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
8
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
9
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
10
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
11
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
12
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
13
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
14
उल्हासनगरचे माजी नगरसेवक गोदुमला किशनानी यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी
15
IND vs AUS: सर डॉन ब्रॅडमन यांच्या 'बॅगी ग्रीन' टोपीचा लिलाव, मिळाली मोठी किंमत! आकडा ऐकून थक्क व्हाल
16
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे
17
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
18
राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं
19
"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ
20
Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

सांगली जिल्ह्यातील तात्यांच्या बनगरवाडीत थिरकल्या नृत्यांगना, डीजेंचा दणदणाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 3:23 PM

गावातील वृद्धमंडळींना त्रास

लक्ष्मण सरगर

आटपाडी : थोर साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी दुष्काळी भागातील पाण्याच्या दुर्भिक्षतेने गाव सोडून जगण्यासाठी गेलेल्या बनगरवाडीचे भयानक वास्तव कथानक स्वरूपात ‘बनगरवाडी’ या कादंबरीतून मांडले. मात्र तीच बनगरवाडी आता वेगळ्या वळणावर पोहोचल्याचे चित्र दिसून आले. इथले अनेक तरुण वरातीसमोर नृत्यांगना नाचवत बीभत्स गाण्यावर नृत्य करताना दिसले.व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी साकारलेली बनगरवाडी अर्थात आजची लेंगरेवाडी (ता. आटपाडी) होय. त्या काळातील तरुण मास्तर हा मुलांनी शिकावे यासाठी धडपडत होता. दुष्काळ जरी असला तरी परिस्थिती फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच बदलू शकते याबाबत ठाम विश्वास होता. आता बनगरवाडी बदलली आहे. शिक्षण घरोघरी पोहचले आहे. दुष्काळ हटून सुकाळाकडे गावाची वाटचाल सुरू आहे. गाव सोडून जाणारी मंडळी गावातच बऱ्यापैकी स्थिरावली आहेत. तर काही माथाडी कामानिमित्त मुबंई, पुण्यात स्थलांतर होत आहेत.काळ बदलला असून विवाह सोहळ्यातून परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडत नाही. सोहळे बदनाम होऊ लागले आहेत. शिकलेले अनेक तरुण चंगळवादी बनू लागले आहेत. याचेच उदाहरण बुधवारी लेंगरेवाडीत पहायला मिळाले. गावात एकाच दिवशी तीन विवाह सोहळे पार पडले. नवदाम्पत्यांची वरात डीजेच्या तालावर सुरू झाली. जेमतेम दोनशे ते तीनशे फूट अंतरावरील रस्त्यावर एकाच ठिकाणी तीन डीजेवाल्यांची स्पर्धा रंगली. त्यावर कहर म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बीभत्स नृत्यांवर नाचणाऱ्या आठ ते दहा नृत्यांगना तरुणांना आकर्षित करत होत्या. यामुळे सुमारे हजारहून अधिक तरुण बेभानपणे डीजेच्या तालावर नृत्यांगनासमोर नाचत मोबाइलमध्ये छबी टिपताना दिसले.तरुण पिढी शिकली व मोठी झाली. त्यांच्या हातात जग आले. मात्र आज बीभत्स नाचणारी तरुणाई वेगळ्या वळणावर पोहचल्याचे दिसत आहे. साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांची त्या काळातील बनगरवाडी सध्या कात टाकत असली तरी येथील तरुणाई धोक्याच्या वळणावर चालली आहे.गावातील ज्येष्ठ मंडळींनी अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे. मात्र प्रतिष्ठित नागरिकच मुलाच्या वरातीला डीजे आणून नृत्यांगना वरातीसमोर नाचवत असतील तर तरुणाईला कोण आवरणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आवाजाने थरकापलेंगरेवाडीत अनेक वयोवृद्ध पुरुष व महिला आहेत. गाव अतिशय लहान असल्याने एकाच डीजेचा आवाज वयोवृद्धांना सहन होत नाही. एकाचवेळी तीन डीजे सुरू झाल्याने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. कर्णकर्कश्श आवाजाने व डीजेवाल्यांच्या स्पर्धेने अनेक रुग्णांना त्रास जाणवला.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळ