शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Sangli News: सागरेश्वर देवालयाच्या जागेचा वाद चिघळला, पुजाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 5:33 PM

गेल्या अनेक वर्षापासून सागरेश्वर परिसरातील वादग्रस्त २० आर जागेचा वाद न्यायप्रविष्ट

देवराष्ट्रे : सागरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या कुंडाजवळ सागरेश्वर देवस्थानमार्फत पाण्याचा फिल्टर बसवण्याचे काम चालू होते. पण ते काम केदारनाथ महाराजांच्या भक्तगणांनी बंद केले. सागरेश्वरच्या पुजाऱ्यांविरुद्ध  पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.सागरेश्वर देवस्थानच्या मुख्य मंदिरापासून पाच फूट अंतरावर पाण्याचे तीन कुंड आहेत. येथे येणाऱ्या भक्तांसाठी पाण्याचा फिल्टर बसवण्यात येणार होता. पण केदारनाथ महाराजांच्या भक्तांनी यास विरोध केला आहे. सागरेश्वर येथील जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे बांधकाम करायचे असेल तर शासकीय परवानगी आणून करा, असा तक्रार अर्ज केदारनाथ भक्तगणांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सागरेश्वर परिसरातील वादग्रस्त २० आर जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. याबाबत अनेक वेळा वाद विवाद झाले आहेत. प्रसंगी देवराष्ट्रे गावात गाव बंद, रस्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर हा वाद न्यायालयात गेला आहे.  केदारनाथ महाराज विरुद्ध सागरेश्वर देवस्थान, देवराष्ट्रे ग्रामपंचायत असा वाद आहे. केदारनाथ महाराज ट्रस्टला देण्यात आलेली २० गुंठे जमीन अद्याप न्यायालयाने मोजमाप करून दिलेली नाही. त्या जमिनीची मोजणीही झाली नसल्यामुळे जागा कुठपर्यंत आहे, हे कोणालाही माहिती नाही, ही बाब न्यायप्रविष्ट आहे. आता पाण्याच्या कुंडाजवळ फिल्टर बसवण्यावरून पुन्हा एकदा सागरेश्वर देवस्थान विरुद्ध केदारनाथ महाराज असा वाद पोलिस ठाण्यात आला आहे.ग्रामपंचायत सदस्यांची आज तातडीची बैठकमुख्य मंदिराच्या पाच फूट अंतरावर जर केदारनाथ भक्तगण अधिकार सांगायला लागले तर उद्या मंदिराचा ताबा घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. यासाठी गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सरपंच निर्मला बोडरे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीTempleमंदिर