शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

सांगलीत पूरपातळी ६ इंचांनी उतरली, कोयनेतून विसर्ग कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 1:13 PM

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी चोवीस तासांत ६ इंचांनी घटली आहे. कोयना व अलमट्टी धरणातून विसर्ग कायम असून, पाणीपातळी स्थिर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सांगली जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ३.३ मिमी पाऊस झाला. शिराळा तालुक्यात १८.७ मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदला आहे. शनिवारी रात्री आठ वाजता सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३९.११ फूट इतकी होती. रविवारी रात्री आठ वाजता ती ३९.५ फूट झाली. पाणीपातळीत कधी घट, तर कधी वाढ होत असल्याने पूरग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था आहे.कोयना धरणातून अद्याप ५२ हजार १०० क्युसेकने, तर अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार ५९ मिमी पावसाची, तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात २५ मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

सांगली जिल्ह्यातील पूरपातळीबहे १२.५ताकारी ४२.१०भिलवडी ४१आयर्विन ३९.५अंकली ४४.७म्हैसाळ ५२.८

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर