शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

Sangli: ..अखेर चिंतामणीनगर पुलाचा गर्डर भिंतींवर विसावला

By अविनाश कोळी | Published: June 27, 2024 4:33 PM

युद्धपातळीवर काम : ऑगस्टमध्ये पूल खुला करण्याची तयारी

सांगली : राजकीय कळीचा मुद्दा बनलेल्या सांगलीच्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर गुरुवारी भिंतींवर विसावला. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.पुलाच्या बाजूच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर गर्डर बसणार तरी कधी, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अखेर या गर्डरला मुहूर्त मिळाला. बड्या क्रेनच्या साहाय्याने गर्डर ठेवण्यात येत आहेत. हे गर्डर विसावल्यानंतर पुलाच्या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली आहे. त्यामुळे या मुदतीत ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम करून पूल खुला करावाच लागेल. यापुढे मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतली गेल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे.रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाअंतर्गत वर्षभरापूर्वी सांगलीचा हा उड्डाणपूल पाडण्यात आला होता. जानेवारीअखेरीस या पुलाच्या कामास मुदत देण्यात आली होती. मात्र, पुलाचे काम सतत रेंगाळत राहिले. प्रशासकीय स्तरावर कामाच्या मुदतवाढीचा खेळ रंगला. त्यामुळे नागरिकांचे या पुलाविना पर्यायी मार्गावरून हाल होत आहेत. पर्यायी मार्ग मोठे व चांगले नसल्याने अडचणी वाढल्या आहे. यातच यंदा पुराचा धोकाही वर्तविला जात नसल्याने नागरिकांची चिंता वाढली होती.जुना बुधगाव रस्ता व कर्नाळ रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. हे दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यात बंद होतात. त्यामुळे ये-जा करायची तरी कशी अशी चिंता नागरिकांना सतावत आहे. पुलाचे गर्डर आता बसविण्यात येत असले तरी आणखी दीड महिन्याचा कालावधी पूर्ण कामासाठी लागू शकतो. त्यामुळे यंदाचा पावसाळा नागरिकांना वनवास भोगावाच लागणार आहे. याच पुलाच्या रेंगाळलेल्या कामावरून सध्या भाजप व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. पुलाच्या या कामासाठी पूर्वी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. बांधकामाच्या रचनेत केलेल्या बदलामुळे खर्च वाढला आहे.

टॅग्स :Sangliसांगली