शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच

By अशोक डोंबाळे | Published: July 27, 2024 3:25 PM

अलमट्टीतून तीन लाख क्यूसेक विसर्ग : जिल्ह्यात , धरण क्षेत्रात जोर कमी

सांगली : वारणा (चांदोली), कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोयना धरण ७८.८४ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने ४०.२ फुटांपर्यंतची इशारा पातळी शनिवारी दुपारी ओलांडली आहे. वारणा धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १६ हजार ७८५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून तीन लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे.कोयना धरणात सद्या ८२.९९ टीएमसी पाणी झाला झाला असून ७८.८४ टक्के धरण भरले आहे. शनिवारी कोयना धरणातून ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग चालू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जादा १० हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्याचा निर्णय रद्द केला आहे. वारण धरणात ३०.३६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८२.९९ टक्के भरले आहे. धरणातून १६ हजार ७८५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. धरणात ७६.७० टीएमसी पाणीसाठा असून ६२ टक्के धरण भरले आहे. धरणात दोन लाख १८ हजार २३० क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणातून तीन लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात ११.४ मिलीमीटरजिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ११.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४८.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २४ तासातील पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ४.३ (४२४.७), जत ०.३ (२७२), खानापूर ३.३ (३४०), वाळवा २२.७ (६६५.१), तासगाव ३.७ (४१९.३), शिराळा ४८.१ (९९१.६), आटपाडी ४.४ (२४७.७), कवठेमहांकाळ १ (३७५.९), पलूस ६.९ (४५८.८), कडेगाव १०.४ (४४५).

जिल्ह्यातील पाणीपातळीपाणी पातळी - फूट इंचांमध्येकऱ्हाडचा कृष्णा पूल २५.०९बहे पूल १२.०८ताकारी पूल ४३.७भिलवडी पूल ४२.०८आयर्विन ४०अंकली पूल ४४.७म्हैसाळ बंधारा ५१.९राजापूर बंधारा ५०.०९

धरणामध्ये शनिवारचा पाणीसाठाधरण - आजचा पाणीसाठा - धरणाची क्षमताकोयना - ८२.९९ -  १०५.९९धोम - ९.९५  - १३.५०कन्हेर - ८.४० - १०.१०वारणा - ३०.३६  - ३४.४०दूधगंगा - २१.२४  - २५.४०राधानगरी - ८.३२ - ८.३६तुळशी - ३.२५ - ३.४७कासारी - २.२८ - २.७७पाटगांव - ३.५९ - ३.७२धोम-बलकवडी - ३.३६ - ४.०८उरमोडी - ६.६० - ९.९७तारळी - ५.१० - ५.८५अलमट्टी - ७६.७० - १२३.०८

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदीKoyana Damकोयना धरण