शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

बरगे मोडले, नियोजन कोलमडले...कृष्णेच्या पात्रातील सारे पाणी पळाले; सांगलीत पाणीटंचाई कायम

By अविनाश कोळी | Published: March 11, 2023 7:07 PM

महापालिकेचे नदीपात्रातील इंटकवेल उघडे पडले

सांगली : उन्हाळ्याच्या तोंडावर दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असतानाही पाटबंधारे विभागाने ऐन टंचाई काळातच बरगे काढल्यामुळे नदीपात्रात पाणी थांबण्याऐवजी वाहून जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नदीपात्रातील इंटकवेल उघडे पडले आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून, सांगली व कुपवाड या दोन्ही शहरांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.सांगलीतील कृष्णा नदीतील बंधाऱ्याचे जुने लाकडी बरगे पाटबंधारे विभागाने काढले आहेत. बरगे काढल्यानेे पात्रातील पाणी हरिपूरच्या दिशेने वाहून गेले. आयर्विन पुलापासून जॅकवेलपर्यंतच्या पात्रातील पाणीही घटल्याने महापालिकेचे दोन इंटकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सांगलीत नदीतील बंधाऱ्याला पूर्वीपासून लाकडी बरगे होते. ते खराब झाल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने ते काढून टाकले आहेत. आता बंधाऱ्याची डागडुजी व नव्याने बरगे बसविण्याबाबतचे काम हाती घेतले आहे. हे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. हिवाळ्यातच हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ज्यावेळी पाण्याची मागणी वाढते व नदीपात्रातील पाणीपातळी घटते अशावेळी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही बरगे नसल्याने नदीपात्रातून पाणी वाहून जात आहे. शनिवारीही दिवसभर लाखो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे महापालिकेचे इंटकवेल शनिवारीही उघडेच राहिले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी