शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:10 PM

प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका

सांगली : कवलापूर विमानतळाची जागा एका कंपनीच्या घशात घालून महाआघाडीच्या सरकारने मोठा घोटाळा केला आहे. याची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. या जमीन घोटाळ्यामागे जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यासह एका माजी मंत्र्यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.पवार म्हणाले की, कवलापूर विमानतळाची जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. ही १६० एकर जागा केवळ ४४ ते ४५ कोटी रुपयांना एका कंपनीला देण्यात आली. वास्तविक या जागेची किंमत ५०० कोटींपेक्षा अधिक आहे. जागेचा व्यवहार करताना जाहीर लिलाव पद्धतीने केला नाही. गूपचूप व्यवहार करण्यात आला. संबंधित कंपनीला प्रकल्पासाठी ३० एकर जागेची गरज होती. त्यापेक्षा अधिक १३० एकर जागा देण्यात आली आहे. कवडीमोल किमतीने जागा घेऊन प्लाॅट पाडून कोट्यवधी रुपयांना विकण्याचा डाव आहे. यामागे जिल्ह्यातील चार लोक असून, त्यात दोन बडे नेते आहेत, तर दोघेजण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत.हा व्यवहाराची माहिती तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांना कशी झाली नाही? त्यांनी जनतेसमोर येऊन या साऱ्या प्रकरणाचा खुलासा करण्याची गरज आहे. माजी महापौर सुरेश पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे, पण त्यांनीही ५० एकर जागेची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूबाबतही शंका येते. या जागेत जिल्ह्यातील तरुणांनी उद्योग उभे करावेत. त्यासाठी शासनाने स्वत: प्लाॅट पाडून त्याची जाहीर लिलावाने विक्री करावी, यासाठी भाजपच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पत्र दिले आहे. मकरंद देशपांडे पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यास संबधितांना निश्चित बेड्या पडतील, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी