सांगली : मराठा समाज संस्थेने 'अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगलीतील पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात आणि साताऱ्यातील कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांना पुरस्कार देण्यात येईल. रविवारी (दि. २ ऑक्टोबर) निवृत्त सनदी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांचे हस्ते सांगलीत पुरस्कार प्रदान सोहळा होईल.ॲड. दत्ताजीराव माने अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हास्तरीय कार्यकर्ता पुरस्कारासाठी थोरात यांची निवड झाली. राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कारासाठी सातारा येथील श्रीमंत पोतदार यांना निवडण्यात आले. मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पुरस्कारांची घोषणा केली. थोरात हे नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने २३ वर्षांपासून अंनिसचे पूर्णवेळ काम करत आहेत. सध्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांनी आजवर अनेक बुवाबाबांचा भांडाफोड केला आहे. ॲड. दत्ताजीराव माने यांच्यासोबत अंनिस, डॉ. दाभोलकर यांच्यावर सनातन्यांनी दाखल केलेले अनेक खटले लढविले व जिंकले. थोरात यांनी माने यांचे 'आयुष्यावर बोलू काही' हे मुलाखतपर आत्मचरित्रही लिहिले आहे.पोतदार हे अंनिसचे गेली २५ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. दाभोलकर यांच्या अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, मध्यवर्ती कार्यालयीन व्यवस्थापन, राज्यस्तरीय जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन यात्रा आदी उपक्रमात सक्रिय असतात. अनेक बुवाबाबांचा भांडाफोड केला आहे. सध्या अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
मराठा समाजातर्फे थोरात, पोतदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
By संतोष भिसे | Published: September 19, 2022 6:12 PM