सांगली : जिल्ह्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून पारा चाळीशीच्या घरात गेला आहे. मंगळवारी कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून येत्या आठवडाभरात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.किमान तापमानही सध्या २४ अंश सेल्सिअस आहे. सरासरीपेक्षा दोन अंशाने हे तापमान अधिक आहे. कमाल तापमानाचा विचार केल्यास सांगली जिल्ह्यात २७ एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमान नोेंदले गेले होते. दिवसेंदिवस जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस तापमान चाळीशीच्या घरात राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना त्यामुळे उन्हापासून सतर्क रहावे लागणार आहे. उष्माघाताचा धोका जाणवत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनीही पुरेशी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीचा उकाडाही अधिक आहे. सरासरीपेक्षा सध्या किमान तापमान अधिक आहे. पुढील आठवडाभर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची चिन्हे आहेत.
सांगली जिल्ह्याचे तापमान चाळीशीच्या घरात, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण
By अविनाश कोळी | Published: April 18, 2023 7:21 PM