शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत  

By अविनाश कोळी | Published: August 22, 2024 7:09 PM

विद्यार्थ्यांची चिंता वाढली

सांगली : महाराष्ट्र सीईटी सेलचे संकेतस्थळ गुरुवारी दिवसभर ठप्प असल्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली. शुक्रवार, २३ ऑगस्टला नोंदणीची मुदत संपणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. ‘नीट-युजी’ पात्र झालेले हजारो विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत.वैद्यकीय प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या ८५ टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत नोंदणीची मुदत दिली होती. बुधवारी संकेतस्थळ अत्यंत मंदगतीने सुरू होते. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत हे संकेतस्थळ पूर्ण ठप्प झाले. त्यामुळे दिवसभरात विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. शुक्रवारचा एकच दिवस नोंदणीकरिता शिल्लक असून, इतक्या कमी मुदतीत हजारो विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही. नोंदणीच्या मुदतीमधील दोन दिवस संकेतस्थळामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे मुदतवाढीची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.कॉपी, तसेच ग्रेस मार्कच्या प्रकरणामुळे यंदाची नीटची परीक्षा वादात सापडली होती. न्यायालयात यासंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या सर्व गोष्टींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. आता प्रवेश प्रक्रिया तरी सुरळीत पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्यातही विघ्न येत आहेत. केंद्रीय कोट्यातून प्रवेशाच्या वेळापत्रकात सुरुवातीला चुका झाल्या होत्या. आता राज्य शासनाच्या कोट्यातील प्रवेशावेळी संकेतस्थळामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. अन्य राज्यांतील प्रवेश प्रक्रिया व त्यांचे संकेतस्थळ व्यवस्थित काम करीत असताना महाराष्ट्रातच अधिक गोंधळ दिसत आहे.

..तर विद्यार्थ्यांचे नुकसाननोंदणीस मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील हजारो पात्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या मंदगती कारभारामुळे प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी