शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
Video - भयंकर! नायजेरियात पेट्रोलचा टँकर उलटल्याने भीषण अपघात; १४७ जणांचा मृत्यू
3
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
4
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
5
आतापर्यंत 1,658 महिला लढल्या, पण विजयी झाल्या फक्त 161
6
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
7
महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे; नाना पटोलेंची टीका
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
9
जीआरमुळे आचारसंहिता भंग झाली का, ‘व्होट जिहाद’ शब्दही तपासणार - चोक्कलिंगम 
10
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
11
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
12
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
13
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
14
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
15
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
16
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
17
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
18
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
19
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा

चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:38 PM

शिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात.

सांगली : एका क्षेत्रात पुढे आलेल्या महिलेला घरात जाऊन स्वयंपाक करायला व स्मशानात जायला सांगणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देशातील सर्व महिलांचा अवमान केला आहे. भाजप नेत्यांची महिलांप्रती कसी मानसिकता आहे, हे यातून दिसून येते, अशी टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.त्या म्हणाल्या की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य लाजीरवाणे व महिलांप्रती अवमानकारक आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे येत आहेत. राजकारणातही महिलांनी गरुरभरारी घेतली आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संसदरत्न पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या कर्तृत्वावर संसदेने शिक्कामोर्तब केले असताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना राजकारण सोडून स्वयंपाक करायला जाण्याचा व स्मशानात जाण्याचा सल्ला दिला. ही केवळ चंद्रकांत पाटील यांचीच नव्हे तर भाजपचीच मानसिकता आहे. या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी देशातील महिला वर्गाची माफी मागायला हवी.शिवसेना झुकणार नाहीभाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. या यंत्रणांना भाजपने राजकीय बनविल्यामुळे लोकांचा या यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठेही छाापा पडला तर लोकांना त्यामागचे राजकारण कळते. तरीही या दबावतंत्राने शिवसेना कधीच झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.राष्ट्रवादीशी असलेला संघर्ष सुटेलइस्लामपूरसह सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. सामंजस्याने व समन्वयाने हा संघर्ष थांबविण्यात येईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

संपर्क अभियानाचा फायदा होईल

शिवसेना संपर्क अभियानातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी व मते नोंदवून मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार आहोत. हे् प्रश्न नक्की सुटतील व संपर्क अभियानातून पक्षाला फायदा होईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

भाजपचे हिंदुत्त्व राजकीय फायद्याचेशिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात. देशात सध्या मंदिर व मशिदीचा वाद निर्माण करुन महागाई व बेराेजगारीच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटील