अतुल जाधवदेवराष्टे : सागरेश्वर अभयारण्य व चौरंगीनाथ वनविभागाचे वनक्षेत्र अशा घनदाट झाडीने व्यापलेल्या सोनहिरा परिसरात मुबलक पाणी व परिसरात वाढलेली झाडी यामुळे रंग बदलणाऱ्या सरड्यांची म्हणजेच शॅमेलियनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच वर्षापासून रंग बदलणाऱ्या सरड्यांना वाचवण्यासाठी झटणाऱ्या महेश पाटील यांच्या कार्याला यश आले आहे.या बिनविषारी सरड्यास घोयरा सरडा अर्थातच शॅमेलियन असे म्हणतात. हा एक अतिशय शांत आणि बिनविषारी जीव आहे. सद्या सोनहिरा परिसरात हा सरडा मोठया प्रमाणात आढळत आहे. मात्र भितीपोटी लोक त्यास फरुड समजून मारत आहेत. या जिवास वाचविण्यासाठी महेश पाटील या युवकांची धडपड चालू आहे. शॅमेलियनसाठी लागणारे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या जातीच्या सरड्यांची संख्या या परिसरात झपाट्याने वाढत चालली आहे.महेश पाटील हा सर्पमित्र आहेत. त्यांनी या जातीच्या सरड्याच्या बाबत जिव्हाळा निर्माण झाला तेव्हा पासुन त्याना असा घोयरा जातीचा रंग बदलणारा सरडा आढळल्यास त्याबाबत जनजागृती करतात व त्या सरड्यांना वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
या सरड्यास धावता येत नाही. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी तो आजूबाजूच्या परिसरानुसार रंग बदलत असतो. जर ते शक्य होत नसेल आणि शत्रु जवळच आला तर हा सरडा स्वत:च अंग आणि गळा फ़ुगवुन आपण भयानक असल्याचा भासवतो. त्याला दात असतात. त्यामुळे घोयरा चावल्यास लहानशी जखम होते. मात्र हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतातील किटके खातो. यामुळे त्यांच्यापासून कोणतीही हानी नाही. - महेश पाटील