शरद जाधवसांगली : जिल्ह्यात राज्यमार्गांचा सुधारत चाललेला दर्जा, त्यात वाहनांची वाढलेली वर्दळ, यामुळे राज्य महामार्गावरून सुसाट वाहने जात आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग जात असतानाही या वर्दळीच्या महामार्गापेक्षाही ‘इतर रस्त्या’वरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेगावर नियंत्रण न ठेवता वाहने चालविली जात असल्यानेच हे अपघात घडले आहेत, तर काही अपघात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेही घडले आहेत.
जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू हा आशियाई मार्ग जातो, तर रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचेही काम पूर्ण होत आले आहे. याशिवाय विजापूर गुहागर हा महत्त्वाचा मार्गही जातो. याशिवायचे इतर महत्त्वाचे मार्ग राज्य मार्गात मोडतात. राष्ट्रीय महामार्गावर तुलनेने वाहतूक जास्त असतानाही गेल्या सहा महिन्यांत या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी आहे. राष्ट्रीय महामार्गावरही अपघात होत असले, तरी त्याचे प्रमाण अन्य ठिकाणांपेक्षा कमी आहे. इतर जिल्हा मार्ग मात्र, मृत्यूचे सापळे बनले आहेत.इतर जिल्हा मार्गावर अपघात वाढल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. या मार्गावर इती वर्दळीच्या मार्गापेक्षाही जादा अपघात घडले आहेत. अरुंद रस्त्यावरून होत असलेली वाहतूक आणि रस्ता चांगले झाल्याने वेगावर नियंत्रण न राहिल्याने घटना घडत आहेत.ही आहेत कारणे
- जिल्ह्यातील काही राज्यमार्गांचा दर्जा चांगलाच सुधारला आहे. पूर्वी खड्डेमय असलेल्या हे मार्ग आता दर्जेदार झाल्याने वाहनेही सुसाट जातात. परिणामी, वेगावर नियंत्रण न राहिल्याने अपघात होतात.
- काही राज्यमार्ग नावालाच आहेत. पेठ-सांगली मार्गाचे नुकतेच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले असले, तरी यापूर्वी राज्यमार्ग असलेल्या हा मार्ग मृत्यूचा सापळाच बनत आहे.
- सांगली-विटा, तासगाव-आटपाडी मार्गावर वाहतूक वाढल्याने अपघात घडत आहेत. यातही तासगाव-सांगली मार्गावर रस्ता कमी आणि वाहतूक जास्त अशी स्थिती झाली आहे.
इतर मार्ग कोणते?
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या यंत्रणांकडून मार्ग तयार केले जातात. यात राष्ट्रीय, राज्य महामार्ग सोडून असलेले रस्ते इतर मार्गात असतात. तुलनेने वाहतूक कमी असल्याने या रस्त्यांची दुरवस्थाही झाल्याने अपघात वाढले आहेत.चौकट
जानेवारी ते जूनअखेर झालेले अपघातरस्त्याचा प्रकार अपघातांची संख्या
राष्ट्रीय महामार्ग २२राज्य महामार्ग २८जिल्हा रस्ते १३इतर रस्ते ४९एकूण ११२