सांगली : जिल्ह्यात महिला मतदारांचा टक्का घटला आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ५१ हजार ६८९ ने कमी झाली असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधून समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण २४ लाख नऊ हजार ७७ मतदारांची नोंदणी आहे. ६७ हजार ७५२ नवीन मतदार नोंदले गेले आहेत. त्यात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे.
जिल्ह्यात २४ लाख नऊ हजार ७७ एकूण मतदारांची संख्या आहे. मागील लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत सहा लाख मतदारांची नव्याने भर पडली आहे. मिरज, सांगली आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात तीन ते सव्वातीन लाख मतदारांची संख्या आहे. उर्वरित मतदारसंघांत तीन लाखांच्या आतच मतदारांची संख्या आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या कमी असल्याचे दिसत आहे.
नवमतदारांची नोंदणी सुरूचलोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी निश्चित केली आहे. विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आणि घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली होती. यामुळे नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केल्याने नवमतदारांचा टक्का वाढला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजूनही मतदारांची नोंदणी सुरूच असल्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले.
पुरुषांच्या तुलनेत महिला ५१६८९ कमीपुरुष : १२३०३२६महिला : ११७८६३७
विधानसभानिहाय आकडे काय सांगतात?विधानसभा मतदारसंघ - पुरुष - महिलामिरज- १६२३६६ - १५७६१२सांगली- १६७३१४ - १६४२८५इस्लामपूर- १३६८७४ - १३२२३३शिराळा- १५१६२४ - १४३८८२पलूस-कडेगाव-१४२३७१ - १४०६२६खानापूर- १६९६९६ - १६२३४०तासगाव-कवठेमहांकाळ-१५२७०६ - १४५५११जत- १४७३७५ - १३२१४८