शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Sangli: रेल्वेखाली उडी घेऊन तरुण संपवणार होता जीवन, पोलिसांनी वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 3:28 PM

नातेवाइकांनी मोबाइल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळविले.

सांगली : पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलिस ठाणे हद्दीतून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरू होता. फिरतफिरत तो सांगलीत आला होता. सांगलीत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे नातेवाइकांना फोन करून सांगितले. नातेवाइकांनी मोबाइल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून गुरुवारी त्याला सांगली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी नातेवाइकांच्या ताब्यात दिले.अधिक माहिती अशी, कोंडीराम अर्जुन जेधे (वय २५, मूळ रा. बीड) हा सध्या रूपीनगर (तळवडे, पुणे) येथे राहत होता. दि. ६ रोजी तो राहत असलेल्या खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर परतला नाही. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याचे नातेवाईक योगेश येवले (रा. पाटोदा, जि. बीड) यांनी दि. ८ रोजी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याचा शोध सुरू होता. फिरतफिरत तो सांगलीत आला होता. गुरुवारी त्याने नातेवाईक येवले यांना कॉल करून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला व त्याची माहिती देण्यात आली.विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अंमलदार रोहित बन्ने व श्रीधर फुके यांनी कोंडीराम याचा शोध सुरू केला. मोबाइल लोकेशनवरून शोध सुरू असतानाच त्याने मोबाइल बंद केला. तेव्हा बन्ने यांनी चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकांकडून कोंडिरामचा फोटो मागून घेतला. फोटोवरून सांगली रेल्वेस्थानकावर शोध घेऊन कोंडिरामला ताब्यात घेतले. तेव्हा तो नशेत असल्याचे आढळून आले. रेल्वेखाली उडी घेण्यापासून त्याला रोखले.नातेवाइकांच्या ताब्यातकोंडिरामला ताब्यात घेतल्यानंतर चिखली पोलिस ठाण्यामार्फत नातेवाइकांना कळविले. शुक्रवारी नातेवाइक सांगलीत आल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी पोलिस अंमलदार बन्ने व फुके यांचे आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेPoliceपोलिस