शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला

By हणमंत पाटील | Published: March 18, 2024 4:07 PM

सांगलीचा दबदबा कुठे गेला..

हणमंत पाटीलसांगली : आपला विधानसभा मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी लोकसभेला तडजोडी (सेटलमेंट) करण्याचा फंडा जिल्ह्याच्या राजकारणात ३५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खासदार म्हणून कणखर नेतृत्व तयार न झाल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा शाबूत ठेवण्यासाठी जिल्ह्यात चालणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाचा घेतलेला मागोवा..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी आ. विलासराव जगताप यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सेटलमेंटवरून तोंड उघडले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव-पलूस, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ व सांगली विधानसभा मतदारसंघात मागील ३० ते ४५ वर्षांपासून सुरू असलेली ठराविक नेत्यांच्या घराणेशाहीवर आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

प्रत्येक लोकसभा निवडणुकीत खासदार होण्यासाठी इच्छुक उमेदवारासोबत आमचा विधानसभा मतदारसंघ सोडवून घेण्याचे तडजोडीचे राजकारण केले जाते. निवडून येणाऱ्या खासदाराने आमच्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करायचा नाही, हे राजकारण जिल्हापातळीवरील नेतृत्व व विकासाला मारक ठरत आहे. सांगली जिल्ह्यातील मतदारांनी आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी लोकसभा निवडणुकीत गांभीर्याने व अधिक सजगतेने मतदान करावे. तरच जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरणाऱ्या तडजोडीच्या राजकारणाला सुरुंग लागेल.

सांगलीचा दबदबा कुठे गेला..देशाच्या स्वातंत्र्यानंतर सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्यापासून राज्याच्या राजकारणावर सांगलीचा दबदबा होता. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत हा दबदबा कायम होता. तो काही प्रमाणात पुढे डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील व आर. आर. पाटील यांनी कायम ठेवला. तरीही पुढे सोयीच्या राजकारणाने आपल्या जिल्ह्यातील राजस्तरीय नेत्याला रोखण्यासाठी विचित्र राजकीय खेळी जिल्ह्यातील काही नेतृत्त्वांनी सुरू केली. त्यामुळे १९८० नंतरच्या विधानसभा निवडणुकीपासून सांगलीचा दबदबा कमी होत गेला. त्यामुळे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळता राज्याच्या राजकारणात एक व दोन नंबरचे स्थान मिळविण्याची संधी जिल्ह्यातील नेतृत्वाला मिळाली नाही. उलट एकाच मतदारसंघातून दोन्ही विरोधक एक खासदार व दुसरा आमदार होण्यापर्यंतच्या राजकीय तडजोडीविषयी उघडपणे बोलले जाऊ लागले आहे.

‘तासगावात आबा अन् सांगलीत काका’

१९७८ ते २०२४ या ४६ वर्षांच्या राजकारणात दिनकरराव पाटील व आर. आर. पाटील या दोन्ही घराण्यांच्या हातात तासगाव विधानसभा मतदारसंघाची सत्ता आहे. दिनकरराव पाटील यांच्यानंतर पुतणे खा. संजय पाटील यांनी राजकीय सूत्रे हाती घेतली. तर आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पत्नी व आ. सुमन पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांच्या हाती राजकीय सूत्रे आहेत. दरम्यानच्या काळात २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात तासगावमध्ये नवीन राजकीय पॅटर्न उदयास आला. तासगावात विधानसभेसाठी आर. आर. आबा यांचे वारसदार अन् सांगलीत खासदारकीसाठी काका ही नवीन राजकीय तडजोड १० वर्षांपासून सुरू झाली आहे.

वसंतदादा घराण्याला विरोध का?

दक्षिण साताऱ्यातून सांगलीच्या स्वतंत्र अस्तित्त्वापासून जिल्ह्याचे नेतृत्व वसंतदादा पाटील की, राजारामबापू पाटील यांनी करायचे हा जुना म्हणजे ५० वर्षांपासूनचा वाद आहे. १९८० ला वसंतदादा पाटील ते २०१४ पर्यंत प्रतीक पाटील अशी तीन पिढ्या सलग ३५ वर्षे दादा घराण्याकडे सांगलीचे नेतृत्व आहे. परंतु जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांच्या छुप्या पाठिंब्यावर व मोदी लाटेत संजय पाटील हे भाजपचे पहिले सांगलीचे खासदार झाले. आता पुन्हा विशाल पाटील यांची लोकसभेच्या माध्यमातून सांगलीची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना स्वाभिमानीची उमेदवारी घेऊनही अपयश आले. परंतु वसंतदादा यांच्या घराण्यातील वारसदार म्हणून विशाल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील तडजोडीच्या राजकारणामुळे अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस