शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

By संतोष भिसे | Published: May 06, 2024 5:12 PM

मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येणार

सांगली : मतदान केंद्रांवरील रुक्ष आणि तणावपूर्ण वातावरणात दिलाशासाठी प्रशासनाकडून अनेक हटके उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक मतदान केंद्र महिला कर्मचारी हाताळतील. एक केंद्र दिव्यांग कर्मचारी, तर एक कर्मचारी संपुर्णत: युवा अधिकारी सांभाळणार आहेत.लोकसभेसाठी मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यात मतदान होत आहे. त्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याअंतर्गतच मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुके द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील मणेराजुरी येथील मुलींच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र द्राक्षभूमी या संकल्पनेतून सजविली जाणार आहे. द्राक्षांची छायाचित्रे, भित्तीचित्रे आदींसह द्राक्षघडांची सजावट असेल.वाळवा तालुका ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इस्लामपूर शहरातील हजरत मोहम्मद सुलेमान उर्दू हायस्कूल या केंद्राची सजावट करताना ऊस पिकाची संकल्पना राबविण्यात आली आहे. प्रत्यक्ष ऊसासह ऊस शेती, साखर कारखाना, ऊसतोड मजूर आदींची भित्तीचित्रे तेथे असतील.सांगली शहरातील नवीन अग्नीशमन केंद्राजवळील महापालिका शाळा क्रमांक २४ आणि इंदिरानगरमधील एमएचआय प्रायमरी उर्दू स्कूल ही मतदान केंद्रे चित्रांनी सजविली जाणार आहेत. निवडणूक काळात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील चित्रे या केंद्रांत मांडण्यात येणार आहेत.फक्त महिला कर्मचाऱ्यांकडून चालवली जाणारी मतदान केंद्रे : आदर्श शिक्षण मंदिर, मिरज, जिल्हा परिषद शाळा वासुंबे (ता. तासगाव), विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा, यशवंत हायस्कूल, इस्लामपूर, तलाठी कार्यालय, विटा, जिल्हा परिषद कन्नड शाळा, जत, श्रीरंग कदम महाविद्यालय, कडेगाव.दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालविली जाणारी केंद्रे :  अंबाबाई तालीम संस्थेचे फार्मसी महाविद्यालय, मिरज, प्राथमिक शाळा, रेड (ता. शिराळा), श्रीरंग कदम महाविद्यालय, कडेगाव.आदर्श मतदान केंद्रे : बापुजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, महांकाली हायस्कूल, कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोकरुड (ता. शिराळा), उर्दू हायस्कूल, इस्लामपूर, बळवंत महाविद्यालय, विटा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जत, उर्दू प्राथमिक शाळा, इंदिरानगर, सांगली, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर, पलूस.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान