शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

गाईच्या दुधाचे दर घसरले, पशुखाद्याचे दर वाढले; पशुपालक आर्थिक अडचणीत 

By अशोक डोंबाळे | Published: January 10, 2024 12:06 PM

अशोक डोंबाळे सांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध ...

अशोक डोंबाळेसांगली : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने, दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पशुखाद्याच्या दरात ५० किलो पोत्याला १०० ते १५० रुपये वाढले असून, गायीच्या दुधाचे दर प्रति लीटर ५ ते ६ रुपयांनी उतरले आहेत.ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. दुभत्या गाईच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्यांकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्यांना दुग्ध व्यवसाय परवडतो. मात्र, विकत घेऊन जनावरांना चारा घालणे परवडणारे नाही, पशुखाद्याच्या दरात वाढ व दूध दर कमी, अशा विचित्र परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय तोट्याचा ठरू पाहत आहे.जानेवारी, २०२३ मध्ये गोळी पेंढीचा दर ५० किलोच्या पोत्यास १,५५० रुपये दर होता. यामध्ये १५० रुपयांची वाढ होऊन प्रति पोते १,७०० रुपये दर झाला आहे. शहराजवळील मोठे दुग्ध व्यावसायिक आणि दूध डेअरी चालकांना १,६२० रुपयांना पेंढीचे पोते मिळत आहे. शेंग पेंडीला जानेवारी, २०२३ मध्ये प्रति पोते २,८०० ते २,९०० रुपयांना शेतकऱ्यांना मिळत होते. सध्या पोत्याचा ४०० ते ३०० रुपये दर वाढला आहे. खाद्याच्या किमती वाढल्याने जादा किमतीत खाद्य खरेदी करावे लागत आहे. दुधाचे दर ५ ते ६ रुपयांनी घसरले आहेत. एकूण परिस्थिती पाहता दुग्ध व्यवसाय अडचणीत असून, यातून शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे.

छोटे पशुपालक तोट्यात

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर लीटरमागे ५ ते ६ रुपयांनी घसरले असून, यापूर्वी प्रति लीटर ३३ ते ३५ रुपये दर मिळत होता, तो आता २८ ते २९ रुपये लिटर मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना ८ ते १० दुभती जनावर आहेत, त्यांना थोडे फार उत्पन्न मिळते. मात्र, ज्यांच्याकडे एक किंवा दोन जनावरे आहेत, त्यांच्यासाठी हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे.

पशुखाद्याचे ५० किलो पोत्याचे दरपेंढीचा प्रकार - जानेवारी २०२३ - जानेवारी २०२४गोळी पेंढ - १,५५० - १,६२० ते १,७००शेंग पेंड - २,८५० - ३,२००भुसा - १,१७० - १,३५०मका भरडा - १,२५० - १,४००सरकी पेंढ (४० किलो) - १,२०० - १,२५०

अनुदानात शेतकऱ्यांची फसवणूकच : उमेश देशमुखमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत गाईच्या दुधाला ३.२ फॅटला प्रति लीटर २९ रुपये दूध संघांनी दर द्यावा, अधिक ५ रुपये शासन अनुदान असे ३३ रुपये दर निश्चित झाला होता, पण शासन आदेशात ३.५ फॅटला २७ रुपये दूध संघ चालकांनी द्यावेत. अधिकचे ५ रुपये शासन अनुदानाचा निर्णय झाला आहे. शासनाने फॅट ०.३ ने वाढविली असून, दरही कमी केला आहे. यामुळे अनुदानामध्ये शेतकऱ्यांची शासनाने फसवणूकच केली आहे, असा आरोप किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी केला आहे.

टॅग्स :Sangliसांगली