सांगली : रेल्वे प्रशासनाने डेमू व पॅसेंजरचा प्रवास कमालीचा स्वस्त केला असून प्रवासखर्चात यामुळे मोठी बचत होत आहे. ४२ ते ५८ टक्क्यांपर्यंत तिकीट दरात घट झाल्याने मासिक व त्रैमासिक पासचे दरही कमी झाले आहेत. रेल्वे बोर्डाने कोरोनापूर्व काळातील पॅसेंजर व डेमू गाड्यांच्या तिकिटाचे दर आता लागू केले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर तिकीट दर स्वस्त झाले आहेत. प्रवाशांचा आर्थिक भार यामुळे कमी होणार आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांसाठी मासिक पासचे दरही कमी असल्याने बचतीच्या ट्रॅकवरून रेल्वे धावणार आहे.
एक्स्प्रेसचे दर कायमसवलतीचे हे दर केवळ डेमू व पॅसेंजर गाड्यांसाठी आहेत. एक्स्प्रेस गाड्यांचे पूर्वीचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.
मासिक पासचे दरगाडी मासिक त्रैमासिकसांगली ते कोल्हापूर २७० ७३०सांगली ते बेळगाव ५२५ १४२०सांगली ते सातारा ४४० ११९०सांगली ते कराड २७० ७३०सांगली ते कुडची १८५ ५००सांगली ते घटप्रभा ३५५ ९६०सांगली ते क. महांकाळ २७० ७३०
या मार्गावरील प्रवासही स्वस्तसांगलीतून आरग, बेळंकी, सलगरे, विजयनगर, शेडबाळ, कुडची या गावांना पॅसेंजरचा १० रुपये तिकीट दर केला असून चिंचली, रायबाग, कवठेमहांकाळ, जत रोड या मार्गावरील तिकीट दर १५ रुपये आहे. सांगलीतून सोलापूर, धारवाड व हुबळीला ५५ रुपयांत जाता येईल.