शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

रेल्वे महाव्यवस्थापक म्हणतात...मिरजेचा पूल पाडावाच लागेल

By अविनाश कोळी | Published: January 24, 2024 7:31 PM

पर्यायी व्यवस्था हवी असेल तर ९ कोटींची गरज

सांगली : मिरजेतील कृपामयीजवळचा रेल्वे उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडावाच लागेल. त्याला पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास राज्य शासनाकडून ९ कोटी रुपये मिळायला हवेत, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी व्यक्त केले.राम करण यादव यांनी बुधवारी सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. मिरजेच्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत विचारणा केल्यानंतर यादव म्हणाले की, संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यात पुलाची क्षमता घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल पाडावाच लागणार आहे. पर्यायी पुलासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून ९ कोटी रुपयांची तरतूद करायला हवी. सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.चिंतामणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिक जागृती मंचने केली. यावर यादव म्हणाले की, संबंधित ठेकेदाराला एप्रिलअखेरची मुदत दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत एप्रिलमध्ये पुलाचे काम पूर्ण होईल. त्याबाबत कोणतीही शंका नाही.सांगली स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाचवर पादचारी पूल उभारण्याची मागणी मंचने केली होती. त्याची दखल घेत पादचारी पूल मंजूर केल्याबद्दल मंचच्या वतीने यादव यांचे आभार मानण्यात आले.

सांगलीमध्ये गाड्यांना थांबा देण्याची मागणीसांगलीतील सतीश साखळकर, प्रमोद पाटील, अमर निंबाळकर, शंभुराज काटकर, सुरेश साखळकर, शरद शहा, विजय शहा, राम काळे, डॉ. दिलीप पटवर्धन यांनी यादव यांच्याशी सांगली स्थानकावरील विकासकामांबाबत चर्चा केली. सांगलीमध्ये जादा गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. मिरज स्थानकाच्याबरोबरीने सांगली स्थानकाचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे