शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Sangli: रिक्षा चालकाने खड्डे मुजविले, अन् महापालिका प्रशासन जागे झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 2:04 PM

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या

कुपवाड : कुपवाड ते विजयनगर रस्त्यावर चाणक्य चौकाजवळील रस्त्यावर दोन खड्डे पडले आहेत. सदरचे खड्डे मुजवावेत, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले. महापालिका लक्ष देत नसल्याने अखेर शुक्रवारी एका रिक्षा चालकाने रिक्षातून खडी आणून दोन्ही खड्डे मुजविले. रिक्षा चालकाच्या या कामाबद्दल अनेकांनी कौतुक केले.कुपवाड ते चाणक्य चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. तसेच खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा दिसून येत नव्हता. त्यामुळे खड्डे मुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु प्रशासनाने डोळेझाक केली होती. शुक्रवारी एका रिक्षा चालकाने स्वतःच्या रिक्षात खडी भरून आणली. ती खडी दोन्ही खड्ड्यांत टाकून ते मुजविले. रिक्षा चालकाच्या या कामाबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल अनेकांनी आभार मानले.महापालिकेला आली जागरिक्षाचालक प्रकाश काळगे यांची खड्डे मुजवितानाची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या. त्यानंतर महापालिका प्रशासनालाही जाग आली. प्रशासनानेही खड्डे मुजविण्याची मोहीम हाती घेतली.लेखापरीक्षण करा : साखळकरमहापालिका क्षेत्रात रस्त्यांच्या कामावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण कामाचा दर्जा चांगला नसतो. त्यावर पॅचवर्कवरही निधी खर्च होतो. गेल्या चार वर्षात पॅचवर्क कामावर किती कोटी खर्च झाले, याचे विशेष लेखापरीक्षण केल्यास अनेक भानगडी बाहेर येतील, असे नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली