शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Sangli: आता नवी समस्या...शक्तिपीठ महामार्ग जाणार पूरपट्ट्यातून

By अविनाश कोळी | Published: June 12, 2024 4:44 PM

भरावामुळे तीव्रता वाढणार : महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मुद्दा उपस्थित

सांगली : शक्तिपीठ महामार्ग पद्माळे, सांगली व सांगलीवाडीच्या पूरपट्ट्यातून जाणार असल्याने शहरासाठी हा रस्ता नवी समस्या बनू शकतो. त्यामुळे महामार्गाची जबाबदारी असलेल्या संबंधित शासकीय यंत्रणेशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केली.सांगलीतील महापालिकेच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते. यावेळी किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख यांनी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन करत असताना आपत्तीला निमंत्रण देणाऱ्या नियोजित महामार्गाबाबत फेरविचार हाेण्याची आवश्यकता आहे.हा मार्ग माधवनगरच्या पश्चिमेकडून पद्माळे, कर्नाळ रस्त्यावरून सांगली, सांगलीवाडी अशा पूरपट्ट्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाईल. या भरावामुळे शहराच्या गावठाणाला महापुराचा मोठा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याविषयी तातडीने निर्णय आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण व रॉयल बोट क्लबचे दत्ता पाटील यांनी प्रशासनास सर्व सहकार्य करण्यासाठी तयारी असल्याचे सांगितले. माजी सभागृह नेत्या भरती दिगडे म्हणाल्या, पूरकाळात शहरातील वाहतुकीबाबत, तसेच पाळीव प्राण्यांच्या काळजीबाबत प्रशासनाने सक्त सूचना देणे आवश्यक आहे. माजी नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, पूरपट्ट्यातील नाले चुकीच्या प्रकारे वळवू नयेत. यासाठी प्रशासनाने पाहणी करून पूर परिस्थितीपूर्वी दक्षता घ्यावी. सांगलीकर म्हणून आम्ही पक्ष आणि अन्य मतभेद बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशासनाच्या बरोबर काम करण्यास तयार आहोत. अनिरुद्ध पाटील, रोनक हर्षद, सचिन साळुंखे यांनी प्राण्यांच्या स्थलांतरासाठी सहकार्य करू, असे स्पष्ट केले.सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी आपत्तीमध्ये महापालिका क्षेत्रात वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दर्शविली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, विशेष कार्यकारी अधिकारी नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.

एकत्रित मदत संकलन हवेनागरिक जागृती मंचतर्फे सतीश साखळक म्हणाले, सांगली आपत्ती व्यवस्थापन समिती करून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही आलेली मदत एकत्र करून ती निवारा छावणीत वितरित करावी. एक सेंट्रल किचन करून तेथूनच सर्व ठिकाणी जेवण, चहापाणी, नाश्ता वितरित करण्यात यावा. याबाबत योग्य तो निर्णय महापालिकेने घ्यावा.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गfloodपूर