इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या रस्ते कामावरून ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला डांबर साहित्याची गाडी न पाठविल्याच्या कारणावरून मुंबई पोलिस दलातील निलंबित उपनिरीक्षकाने आपल्या साथीदारासह हातोड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.याबाबत जखमी जुबेर जमाल खान (वय ३४, सध्या रा. बोरगाव, मूळ रा. चंदेरीया- अमेठी, उत्तरप्रदेश) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलंबित पोलिस उपनिरीक्षक शंकर जयवंत पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर (दोघे रा. बोरगाव) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.खान हा रस्ते काम करणाऱ्या कंपनीकडे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. बोरगावच्या वीटभट्टी चौक परिसरात गाठून वरील दोघा संशयितांनी डांबर साहित्याची गाडी न दिल्याच्या कारणातून चिडून जाऊन शंकर पाटणकर याने माझ्या पेट्रोलपंपाच्या ठिकाणी डांबर साहित्याची चौथी गाडी कधी पाठवणार, असे म्हणत खान याला शिवीगाळ व दमदाटी करत साथीदाराच्या सोबतीने हातोड्याने मारहाण करून जखमी केले.अनेक गुन्ह्यांची नोंदबोरगाव येथील शंकर पाटणकर हा मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून सेवेत होता. तेथे त्याच्याविरुद्ध महिलेवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गुन्हे करण्याचा त्याचा सपाटा सुरूच आहे. त्याच्यावर सावकारी, अपहरण, मारहाण, छेडछाड यासारखे गुन्हे नोंद झाले आहेत.
Sangli: ..अन् निलंबित पोलिसाने एकास हातोड्याने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 4:22 PM