सांगली : डिसेंबर २०१७ नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन परीक्षा शासनाने घेतलेली नाही,त्यामुळे भावी शिक्षकांच्या वयोमर्यादा संपू लागली आहे. शिक्षक होण्याचे त्यांचे स्वप्न विसरून जात आहे. याविरोधात पवित्र शिक्षक संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.समितीचे अध्यक्ष प्रा. अर्जुन सूरपल्ली यांनी सांगितले की, महाराष्ट्रभरातील सुमारे पाच लाख डीएड आणि बीएड पात्रताधारक परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स्नेहा कदम यांनी सांगितले की, परीक्षा वेळेत घेतली जात नसल्याची न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. पण शासन वेळकाढूपणा करत आहे. याच्याविरोधात समितीतर्फे सोमवारी (दि. २३) सकाळी बसस्थानकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. भावी शिक्षक फेटे बांधून, घोषणा फलकांसह हलगी वाजवत सहभागी होतील. चौकाचौकात बेरोजगारीवर पथनाट्ये सादर करतील.
पाच वर्षांपासून झाली नाही शिक्षक अभियोग्यता परीक्षा, सांगलीत आज मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:05 PM