सांगली : लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. १९५७ पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले. बहुतांश पंचवार्षिक निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेसलाही मैदानातून बाहेर व्हावे लागले आहे.सांगली लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजय मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाला २०१९च्या निवडणुकीत जागा मिळाली नाही. त्यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस मैदानात होती. काँग्रेसविरोधातील प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले. २०१४ पासून भाजप विजयी सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर आता त्यांचे प्रतिस्पर्धी सतत बदलत आहेत.सुरुवातीला काँग्रेसशी, नंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षाशी सामना करून आता पुन्हा शिवसेनेशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधात सर्वाधिक वेळा भाजप प्रतिस्पर्धी राहिला. त्यानंतर शेतकरी व कामगार पक्ष, जनता पक्ष, भारतीय लोक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष अशा अनेकांनी जोरदार लढत दिली.
वर्ष - विजयी - पराभूत१९५७ - शेकाप - काँग्रेस१९६२ - काँग्रेस - रिपब्लिकन पक्ष१९६७ - काँग्रेस - शेकाप१९७१ - काँग्रेस - शेकाप१९७७ - काँग्रेस - भारतीय लोक दल१९८० - काँग्रेस - जनता पक्ष१९८४ - काँग्रेस - जनता पक्ष१९८९ - काँग्रेस - भाजप१९९१ - काँग्रेस - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया१९९६ - काँग्रेस - अपक्ष१९९८ - काँग्रेस - भाजप१९९९ - काँग्रेस - राष्ट्रवादी२००४ - काँग्रेस - भाजप२००९ - काँग्रेस - अपक्ष२०१४ - भाजप - काँग्रेस२०१९ - भाजप - स्वाभिमानी पक्ष