शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत

By घनशाम नवाथे | Published: June 05, 2024 7:34 PM

सांगली : विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या ...

सांगली : विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या गीता अनिल कुंचिकोरवी (वय ३०, रा. सुभाषनगर, मिरज), सुनीता भारत पवार (वय २७, रा. वडर कॉलनी, वांगीकर प्लॉट, सांगली) आणि राधा मार्तंड माळी (वय २५, रा. वांगीकर प्लॉट, वडर कॉलनी, सांगली) या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघींकडून १२ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत माहिती अशी, पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटार वाहन विभाग आहे. या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाईन आहे. मोटार वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात आली होती. दि. ४ रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास संशयित तीन महिला मोटार वाहन विभागाजवळ आल्या. त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून वाहनांचे सुटे भाग काढून घेतले.

सुटे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या. तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी ओरडल्यानंतर महिला पळून जाऊ लागल्या. तेव्हा पाठलाग करून तिघींना ताब्यात घेतले. तीन महिलांकडे वाहनांच्या सीट, टायर मॅगवेल, पेट्रोलची टाकी, ॲल्युमिनिअमची तार असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला.पोलिस हवालदार रियाज अहमद मुसा मुजावर यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले आहे.

पोलिसांच्या इलाख्यात चोरीचे धाडसकाही वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. तसेच दुसऱ्यांदा चंदन चोरी करताना चोरट्यास पकडले होते. त्यानंतर पोलिस मुख्यालयात घुसून महिलांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा राबता असलेल्या ठिकाणी चोरीचे धाडस करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस