वांगी : वडीयेरायबाग (ता. कडेगाव) येथून दुचाकी व एक मोबाईल असा ५४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. चिंचणी - वांगी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कऱ्हाड - विटा रस्त्याचे काम करण्याऱ्या कंपनीचे वडीयेरायबाग हद्दीत कार्यालय आहे. या कार्यालयात आबेगाव येथील वैभव शिवाजी महाडिक व अधिक किसन साळुंखे हे काम करीत आहेत. सोमवार दि. २८ रोजी वैभव महाडिक हे आपल्या मालकीची दुचाकी ( एमएच १० डी जे ००१७ ) येथे रात्री १२ च्या दरम्यान कार्यालयासमोर उभी करून कामावर गेले होते. अधिक साळुंखे हे आपला मोबाईल कार्यालयात चार्जिंगसाठी लावून गेले होते. रात्री १ ते ४ वाजन्याच्या दरम्यान मोटारसायकल व मोबाईलची चोरी झाली. या घटनेबाबत चिंचणी - वांगी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार ए. डी. पवार करीत आहेत.