सांगली : सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेच्या कामात अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होणे शक्य नाही. मुदतीत चांगले काम ठेकेदाराने केले नाही, तर आम्ही त्याच्यावर फौजदारी दाखल करून ठेकेदाराला काळ््या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा इशारा उपमहापौर विजय घाडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, प्रशासन आणि ठेकेदाराची मिलिभगत असल्याने योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे. ५० टक्के जादा दराने या योजनेची निविदा मंजूर झाली आहे. तरीही दर्जाहीन काम सर्वत्र दिसून येत आहे. आवश्यकतेपेक्षा जादा खुदाई करून रस्त्यांचे नुकसान केले जात आहे. त्याचबरोबर ही योजना उपनगरांसाठी प्राधान्याने राबवायची असताना उपनगरांमध्ये केवळ ५ टक्केच काम झाले आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देशच हरविला आहे. सांगलीत ३0 टक्के, तर मिरजेत ६0 टक्के योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीतील कामास १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मिरजेतील ट्रंकलाईनचे काम अद्याप अपूर्ण आहे. नियोजनबद्ध पध्दतीने योजनेचे काम सुरू नसल्याचे दिसून येत आहे. मुदतीत चांगले काम करण्याचा ठेकेदाराचा हेतू दिसत नाही. उपठेकेदाराकडून काम करून घेतले जात असताना त्याबाबत कोणतीही विचारणा केली जात नाही. एकूणच योजनेवर प्रशासकीय नियंत्रण दिसत नसल्याचे चित्र आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही, तर संबंधित ठेकेदारावर आम्ही फौजदारी दाखल करू. त्याचबरोबर त्याला काळ््या यादीत टाकण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असा इशारा घाडगे यांनी दिला. (प्रतिनिधी)योजनेचे काम मंदगतीनेप्रतिदिन ३0 ते ४0 मीटर काम अपेक्षित असताना केवळ ५ मीटरचेच काम होत आहे. मंदगतीने होणारे हे काम पाहिले तर मार्च २0१७ पर्यंत दिलेल्या मुदतीत ते पूर्ण होईल, असे वाटत नाही.
...तर ड्रेनेज ठेकेदारावर फौजदारी करणार
By admin | Published: May 08, 2016 12:34 AM