शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
4
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
5
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
6
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
7
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
8
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
9
काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
10
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
11
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
13
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
14
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
15
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
16
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
17
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
19
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
20
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO

...तर दालमियांची उचलबांगडी

By admin | Published: October 30, 2015 11:55 PM

भरत पाटणकर : उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरूच

सागाव : निनाईदेवी कामगारांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस दालमिया शुगरचे प्रशासन हजर न राहिल्यास त्यांची उचलबांगडी करू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. निनाईदेवी साखर कामगारांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कारखाना सभासद व कामगारांच्या महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, डॉ. भारत पाटणकर, हणमंतराव पाटील, पी. वाय. पाटील उपस्थित होते. आंदोलनाची पुढील दिशा आक्रमक करण्याचा इशारा यावेळी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून, सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर, कामगारांशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेऊन तोडगा निघेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, कामगारांच्या प्रश्नांबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवू. डॉ. पाटणकर म्हणाले, सहकार क्षेत्र संपविण्याची मानसिकता या सरकारची असल्याने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कामगारांच्या प्रश्नांबाबतचा लढा आता फक्त कामगारांचा राहिलेला नाही, तर तो कामगार व सभासदांचा संयुक्त लढा सुरू झाला आहे. हा प्रश्न फक्त कामगारांचा नसून शेतकरी, कष्टकरी जनतेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न झाला आहे. आठ दिवस शासकीय व दालमिया प्रशासनाने या आंदोलनाकडे गंमत म्हणून पाहिले. परंतु पुढील लढ्याचा इशारा देताच हे प्रशासनदेखील हादरले. यावेळी विकासराव देशमुख, हणमंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, सभापती चंद्रकांत पाटील, पी. वाय. पाटील, माजी सभापती शारदा धारगे, शारदा पाटील, जि. प. सदस्य सुशिला नांगरे, तानाजी कुंभार, सुनील पाटील, हिंदुराव नांगरे, विकास नांगरे, पोपट पाटील, उत्तम गावडे, सर्जेराव पाटील, माजी उपसभापती आनंदराव पाटील, बाजीराव पाटील, शंकर कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)