सुरेंद्र दुपटेसंजयनगर : सांगली जिल्ह्यात वातावरणातील लहरीपणा कायम असून अचानक आज, सोमवारी शहर व परिसरात पहाटेच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली. तापमानातही काही अंशी घट झाली. यातच हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यात वातावरणात मोठे बदल होत आहेत. सकाळच्या सुमारास धुके, थंडी तर दुपारी उकाडा जाणवत आहे. तर रात्री पुन्हा थंडी जाणवते. वातावरणातील या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. परिणामी ताप, सर्दी, खोकला या आजारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसानंतर आज, अचानकच धुके पडल्याने पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून जाताना कसरत करावी लागली. कधी थंडी, सामान्य तापमान, ढगांची दाटी तर धुके अशा विचित्र वातावरणास सांगलीकरांना सामोरे जावे लागत आहे.
सांगलीत वातावरणात लहरीपणा, पसरली दाट धुक्याची चादर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:10 PM