शिराळा : शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुरंगी लढत होत असून, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख विरुध्द आमदार शिवाजीराव नाईक गट असा थेट सामना होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या सोमवारपर्यंत चाललेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही. बाजार समितीची सत्ता याआधी मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्याकडे आहे. यावेळी आमदार नाईक यांनी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. शिवाजीराव नाईक गटाने १९ जागांसाठी ११ अर्ज दाखल केले आहेत, तर मानसिंगराव नाईक गट ११ व सत्यजित देशमुख गटाने ८ अर्ज शिल्लक ठेवले. यानंतर आमदार नाईक गटास दोन जागा देण्याबाबत तडजोड झाली. आज त्या जागा कोणत्या, याबाबत चर्चा फिसकटली. दोन भाऊंनी १९ जागांसाठी १९ उमेदवार उभे केले आहेत, तर आमदार नाईक यांच्याकडे १९ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. त्यामुळे १९ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था गट : सुरेश महादेव पाटील, संपत नामदेव पाटील, मारुती बाबू येळावी (राष्ट्रवादी), सुभाष बळवंत पाटील, अजित आबासाहेब देशमुख, सुरेश अनंत पाटील, विष्णू मारुती सावळा, पांडुरंग बापू पाटील (भाजप).भटक्या जाती गट : दिलीप दत्तात्रय परदेशी (राष्ट्रवादी), पांडुरंग यशवंत लोहार (भाजप).महिला गट : नंदा विष्णू पाटील (राष्ट्रवादी), कविता सदाशिव पाटील (राष्ट्रवादी), जयश्री दाजिबा पाटील (भाजप).इतर मागासवर्गीय गट : दिलीप बापू कुंभार (कॉँग्रेस), रामचंद्र बळवंत गुरव (भाजप).ग्रामपंचायत गट : ज्ञानू रामू दिंडे (राष्ट्रवादी), शंकर पांडुरंग कदम (कॉँग्रेस), शिवाजी जयवंत पाटील, महादेव बाबूराव जाधव (भाजप).आर्थिक दुर्बल गट : बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी), सुभाष बापू साळुंखे (भाजप).अनुसूचित जाती : मंगेश कांबळे (राष्ट्रवादी), संदीप दिनकर तडाखे (भाजप).व्यापारी गट : कैलास पाटील, नामदेव बेंद्रे (राष्ट्रवादी), बजरंग तेली (भाजप).कृषी प्रक्रिया संस्था गट : भास्कर रामचंद्र महिंद (कॉँग्रेस), तानाजी बाबूराव गुरव (भाजप).हमाल तोलाई गट : शामराव कुरणे (राष्ट्रवादी), युवराज शंकर गिरीगोसावी ( भाजप).अशाप्रकारे माजी आमदार मानसिंगराव नाईक ११, सत्यजित देशमुख ८ जागांवर युती, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाचे १९ जागांसाठी ११ उमेदवार, असे उमेदवार रिंगणात आहेत. (वार्ताहर)प्रशासनासमोर निवडणूक खर्चाचा प्रश्नबाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बाजार समिती प्रशासनासमोर निवडणूक खर्चाचा मोठा प्रश्न आहे. निवडणुकीसाठी जुने पाच संचालक रिंगणात आहेत. निवडणूक खर्चासाठी जवळजवळ दहा लाख रुपये शासनाकडे भरणे आवश्यक आहे. परंतु या समितीची आर्थिक परिस्थिती काही वर्षांपासून बिकट झाल्याने शासनाकडे पैसे कसे भरायचे?, हा मोठा प्रश्न अधिकारी वर्गास पडला आहे. त्यामुळे राजकीय मंडळींबरोबरच बाजार समिती अधिकारी वर्गाचीही धावपळ उडाली आहे.
शिराळा बाजार समितीत दुरंगी लढत
By admin | Published: July 16, 2015 12:11 AM